
रविवार असल्याने कामगारांना सुटी होती. आग लागली त्यावेळी दुकानात कोणीही उपस्थित नव्हते.
कात्रज : कात्रज जवळील गुजरवाडी रस्त्यावरील फर्नीचरच्या गोडाऊनला भीषण आग लागली आहे. घटनास्थळावर 4 फायरगाड्या दाखल झाल्या असून अग्निशामक दलाला आग आटोक्यात आणण्यात यश आले आहे.
गुजर निंबाळकरवाडी रस्त्यावर असणाऱ्या ओम एंटरप्रायसेस आणि इंटेरियरच्या दुकानाला अंदाजे 12:30 वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. आगीत कुठल्याही प्रकारची जीवितहानी झालेली नसली तरी दुकानाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अंदाजे 10 ते 12 लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याची माहिती दुकानाचे मालक विनोद भागात (वय 37, रा. इंदिरानगर) यांनी दिली आहे. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असल्याचा प्राथमिक अंदाज भारती विद्यापीठ पोलिसांनी व्यक्त केला आहे.
पुण्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
आज रविवार असल्याने कामगारांना सुटी होती. आग लागली त्यावेळी दुकानात कोणीही उपस्थित नव्हते. दुकानाचे मालकही सकाळी 11:30 च्या सुमारास दुकान बंद करून बाहेर गेले होते, त्यानंतर ही घटना घडली. आग विझवण्यासाठी विकास नाना फाटे, शिवशंभू प्रतिष्ठाणचे महेश सुरेशभाऊ कदम, सागर खंदारे, राहुल ढेबे, सलीम जमादार यांच्यासह स्थानिकांनी प्रयत्न केले.