अरे कारट्या काय केलंस हे! खेळता खेळता मुलानेच आईला...

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 फेब्रुवारी 2020

सागर प्लाझा इमारतीत दोघे अडकल्याची माहिती अग्निशमन दलाला एका नागरिकाने कळविली. त्यानुसार चौथ्या मजल्यावर एक महिला आणि मुलगा अडकल्याचे समजले.

पिंपरी : खेळताना मुलाने बाथरूमच्या दरवाजाला बाहेरून कडी लावल्याने त्याची आई आतमध्ये अडकली. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी त्यांची सुखरूप सुटका केली. पल्लवी मंगेश पानसरे (वय 27, रा. सागर प्लाझा, कासारवाडी) महिलेचे नाव आहे. 

पुण्यात पेस्ट कंट्रोलमुळे दाम्पत्यचा मृत्यू; वाहतूककोंडीही मृत्यूस जबाबदार

सागर प्लाझा इमारतीत दोघे अडकल्याची माहिती अग्निशमन दलाला एका नागरिकाने कळविली. त्यानुसार चौथ्या मजल्यावर एक महिला आणि मुलगा अडकल्याचे समजले. कर्मचारी दरवाजा तोडून आत गेले असता, मुलगा आदी मंगेश पानसरे (वय एक वर्ष) याने खेळताना बाथरूमच्या दरवाजाला बाहेरून कडी लावल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी या महिलेची सुटका केली. 

पुणे : वाहतूक नियमांचे केले उल्लंघन; झाला तब्बल ७० हजारांचा दंड


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fire brigade rescue mother and child who locked in bathroom at kasarwadi in pune

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: