fire.jpg
fire.jpg

सातारा रस्त्यावरील आरोग्य कोठीसह गॅरेजला आग

सहकारनगर (पुणे) : सातारा रस्त्यावर एस. टी. कॉलनी येथील मनपाच्या कचरा वर्गीकरण करणाऱ्या आरोग्य कोठीस मंगळवारी सायंकाळी सहा वाजता आग लागली. यामध्ये शेजारी असलेल्या गॅरेजला ही आग लागल्याने येथे टायर, ऑइल असल्याने आगीचा भडका मोठा होता. मात्र, जनता वसाहत अग्निशामक दलाच्या जवानांनी ही आग पाऊण तासात आटोक्यात आणल्याने पुढील धोका टळला.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

या घटनेमध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही. यावेळी अग्निशामक फायरमन अनिल कांबळे, मारुती देवकुळे, सचिन क्षिरसागर, अरुण धनवडे, उमेश शिंदे या जवानांना आग विझवण्यात यश आले. यावेळी फायरमन अनिल कांबळे म्हणाले, सातारा रस्त्यावर लागलेल्या आगीची घटना समजताच चार मिनिटांतच अग्निशामक दलाची गाडी घटनास्थळी पोहचली. आगीत कोणतीही जीवित घटना घडली नसून कचरा व गॅरेजला आग लागल्याने आगीचा भडका मोठा होता. मात्र, जवानांच्या साहाय्याने ही आग पाऊण तासात आटोक्यात आणण्यात यश आले. यावेळी स्थानिक सजन नागरिक संतोष पाटोळे यांनी कॉल करून आगीची माहिती सांगितले आणि आग विझविण्यासाठी मदत केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com