esakal | Breaking : महाविद्यालय स्तरावर होणार परीक्षा?; 'यूजीसी'चे उपाध्यक्ष काय म्हणाले पाहा!
sakal

बोलून बातमी शोधा

Final_Year-Students

आता परीक्षाच लांबली असल्याने शैक्षणिक वर्षाच्या वेळपत्रकात बदल होईल. सुधारित वेळपत्रकात जाहीर केले जाईल.

Breaking : महाविद्यालय स्तरावर होणार परीक्षा?; 'यूजीसी'चे उपाध्यक्ष काय म्हणाले पाहा!

sakal_logo
By
ब्रिजमोहन पाटील

पुणे : 'कोरोना'मुळे परीक्षा होण्यास विलंब होत असल्याने विद्यापीठांवरील भार कमी करण्यासाठी चांगल्या महाविद्यालयांना त्यांच्या स्तरावर परीक्षा घेऊ दिल्या जाव्यात, यासाठी विद्यापीठ अनुदान आयोग विचार करत आहे. मात्र, परीक्षेशिवाय पदवी मान्य करणार नाही, असे यूजीसीचे उपाध्यक्ष डॉ. भूषण पटवर्धन यांनी 'सकाळ'शी बोलताना स्पष्ट केले.

पुण्यातील पानशेत पूरग्रस्त सोसायट्या अन् प्रशासन...​

राज्य सरकारने अंतिम वर्षाच्या परीक्षा ऐच्छिक केल्या आहेत. यूजीसीने सप्टेंबर मध्ये परीक्षा घ्या असे आदेश विद्यापीठांना दिले आहेत. यामुळे नवा वाद निर्माण झाला. राज्य सरकारने 'यूजीसी'च्या आदेशाप्रमाणे परीक्षा घेणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामूळे राज्यात परीक्षा होणार का नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. 

पुणे विद्यापीठात गैरव्यवहार? आदेश झुगारत 'ते' पैसे वाटलेच कसे?

याबाबत डॉ. भूषण पटवर्धन म्हणाले, 'यूजीसी'ने एप्रिल महिन्यातच परीक्षा कशी घ्याची मार्गदर्शक सूचना जाहीर केली आहे. जेवढा उशीर केला जाईल तेवढे परीक्षा घेणे अवघड होत आहे. त्यामुळे परीक्षा आयोजनासाठी आम्ही विद्यापीठांना पूर्ण स्वातंत्र्य दिले होते. 'यूजीसी'ही विद्यापीठाची सर्वोच्च संस्था आहे, त्यामुळे परीक्षा ही घ्यावी लागेल. परिक्षेविना विद्यार्थ्यांना दिलेल्या पदवी 'यूजीसी' स्वीकारणार नाही. चुकीच्या गुणपत्रिका घेऊन विद्यार्थ्यांना आयुष्यभर त्रास सहन करावा लागेल. त्यामुळे परीक्षा ही झाली पाहिजे. 

'...यामुळे २७ टक्के विद्यार्थ्यांना यंदा शिक्षण घेता येणार नाही'; सर्वेक्षणातून समोर आली धक्कादायक माहिती!​

विद्यापीठांवर परीक्षा घेताना ताण निर्माण होणार असल्याने महाविद्यालयांच्या स्तरावरच परीक्षा घेतली जावी याबाबत यूजीसी विचार करत आहे. तसेच परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना प्रवास करावा लागू नये यासाठी स्थानिक शाळा, महाविद्यालयांचा वापर करता येऊ शकतो. 'कोरोना'मुळे अडचणी आहेत, पण मार्ग काढावा लागेल. 

शैक्षणिक वर्षात बदल होणार
अंतिम वर्षाच्या परीक्षा जुलै महिन्यात पार पडल्या असत्या तर सप्टेंबरपासून प्रथम वर्षाचे अभ्यास वर्ग सुरू केले जाणार होते. मात्र आता परीक्षाच लांबली असल्याने शैक्षणिक वर्षाच्या वेळपत्रकात बदल होईल. सुधारित वेळपत्रकात जाहीर केले जाईल, असो पटवर्धन यांनी सांगितले. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

महाराष्ट्राची बाजू मांडत आहे
इतर राज्यातील कोरोनाची माहिती घेत असताना त्यात महाराष्ट्रात कोरोनाची स्थिती गंभीर असल्याचे निदर्शनास आले. याबाबतीत ही मी महाराष्ट्राची भूमिका मांडत आहे, असे पटवर्धन यांनी सांगितले. दरम्यान, परीक्षेच्या मुद्द्यावर राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ट्विटरवर डॉ. भूषण पटवर्धन यांना महाराष्ट्राची बाजू मांडा अशी टीका केली होती.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

(Edited by Ashish N. Kadam)