Manchar Fire : मंचर शहरात भर वस्तीतील परिधान कापड दुकानाला आग; तरुणांच्या तत्परतेमुळे मोठी हानी टळली

Cloth Store Blaze : शहरातील भर वस्तीत नगरपंचायत इमारतीसमोर असलेल्या परिधान कापड दुकानाला मंगळवारी (ता.४) रात्री आठच्या सुमारास अचानक आग लागली. आग आटोक्यात आल्याने मोठी दुर्घटना टळली असून, तरुणांच्या तात्काळ मदतीमुळे संपूर्ण इमारत आणि शेजारची दुकाने सुरक्षित राहिली आहेत.
Garment shop fire at Manchar

Garment shop fire at Manchar

sakal

Updated on

मंचर : घटनेची माहिती मिळताच उच्च दाब पाण्याचे पंप आणि मंचर नगरपंचायतीचा टँकर घटनास्थळी मागविण्यात आला. सुमारे ७० ते ८० तरुणांनी नियोजनबद्ध पद्धतीने काम करत अवघ्या अर्ध्या तासात आग आटोक्यात आणली. त्यामुळे तीन मजली इमारतीतील लहान-मोठी अशी १५ दुकाने सुखरूप वाचली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com