esakal | पुण्यात 24 तासात आगीची दुसरी घटना; बिबवेवाडीत मंडप सजावटीच्या गोदाम भस्मसात

बोलून बातमी शोधा

Fire Decorative shop in Bibwewadi in Pune Rasta peth}

बिबवेवाडी परिसरात दुपारी तीनच्या सुमारास सजावटीच्या साहित्याला लागल्याची घटना घडली. अग्निशामक दलाच्या सहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग शमविण्याचे आणण्याचे शर्थीचे प्रयत्न केल्यानंतर आग १ तासानंतर आटोक्यात आली. 

पुण्यात 24 तासात आगीची दुसरी घटना; बिबवेवाडीत मंडप सजावटीच्या गोदाम भस्मसात
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे : गेल्या 24 तासात पुणे शहरात आग लागल्याची ही दुसरी घटना आहे. आज पहाटे  रास्ता पेठेतील मद्रासी गणपतीजवळ एका इमारतीमध्ये आग लागली होती तर दुपारी 3 च्या सुमारास बिबवेवाडी परिसरात बकुळ नगर येथील त्रिमूर्ती मंडप डेकोरेशनच्या गोदमाला दुपारच्या वेळी आग लागून मोठे नुकसान झाले सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही, परंतु आगीमुळे शेजारच्या घरांना मोठ्या प्रमाणात झळा बसलेल्या असून आठ घरातील साहित्य पूर्णपणे जळून खाक झाले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
 

बकुळ नगर येथे राममूर्ती शेट्टी यांचे वीस वर्षांपासून मंडप साहित्याचे सहा हजार चौरस फुटाचे गोदाम असून बुधवारी दुपारी तीनच्या सुमारास गोदमतील पूर्वेकडील कोपऱ्यात सुरवातीला आग लागली त्यावेळी शेट्टी यांचा मुलगा कामगारांना जेवणाचा डबा घेऊन आला होता, आग लागल्याचे दिसताच त्याने वडिलांना फोन करून अग्निशामक दलाला आगीची माहिती दिली. स्थानिक नागरिक व कामगारांनी आग शमविण्याचा  प्रयत्न केला परंतु आगीने काही वेळातच रौद्र रूप धारण केले, त्यामुळे सर्वजण बाहेर पळाले.

गोदमा शेजारील तीन मजली इमारतीच्या वर आगीच्या ज्वाळा पोहोचल्या होत्या, त्यामुळे इमारतीमधील दोन सदनिका व वरील पाण्याचा टाक्या व शेजारील आठ घरे आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या होत्या. गोदमा समोर लावलेल्या चार दुचाकी वाहनांना झळा पोहचून त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

अग्निशामक दलाच्या कात्रज, कोंढवा व मुख्य कार्यालयातील सात बंब व देवदूतच्या तीन व्हॅन आग शमविण्यासाठी प्रयत्न करत होते. सुमारे एक तासाने आग आटोक्यात आली, तोपर्यंत गोदमतील सर्व साहित्य व शेजारील घरामधील साहित्य जळून खाक झाले होते. गोदमा शेजारील राहुल शिंदे यांच्या इमारतीतील दोन सदनिका, गोदमच्या मागील बाजूस असलेल्या मेहबूब शेख, राजेश अबनावे, चंद्रकांत कुरेन, मलकप्पा कुरेन, राजू राठोड, अनिल रासकर, प्रभाकर धसाडे यांच्या सदनिकांना आगीच्या झळा बसून साहित्य जळून खाक झाले.
 

अग्निशामक दलाचे बंब पोहचण्यासाठी विलंब 
बकुळ नगर व परिसरातील रस्ते अरुंद असून दोन मोठी वाहने समोरासमोर जाऊ शकत नाही त्यामुळे अग्निशामक दलाचे बंब येताना अरुंद रस्त्यामुळे आगीच्या ठिकाणी पोचण्यासाठी उशीर झाला, अरुंद रस्त्यावर लावलेली वाहने मोठा अडथळा निर्माण झाला. आग आटोक्यात आणण्यासाठी उशीर झाल्याचे अग्निशामक दल प्रमुख प्रशांत रणपिसे यांनी सांगितले

अरुंद रस्त्यामुळे अग्निशामक बंब पोचण्यासाठी उशीर
मागील दोन वर्षात या परिसरात गोदाम व मसाल्याचे कारखानाला आग लागली होती. त्यावेळी सुद्धा अरुंद रस्त्यामुळे अग्निशामक बंब पोचण्यासाठी उशीर झाला होता. त्यामुळे मोठे नुकसान झाले होते. प्रभाग क्र 36 व 37 मधील सर्व लोकप्रतिनिधी व राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करत नागरिकांना धीर दिला.

पुण्यात 24 तासात आगीची दुसरी घटना 
आज पहाटे रास्ता पेठेतील मद्रासी गणपतीजवळ एका इमारतीमध्ये आग लागण्याची घटना घडली. यात 3 फ्लॅट्स व 2 दुकाने या आगीत जळाली आहेत. तर एका कारचे देखील नुकसान झाले. आज पहाटे 3 वाजता ही आग लागली होती अग्निशमन दलाच्या सहा गाड्यांच्या साह्याने ही आग अटोक्यात आणली. यात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. आगीचे कारण समजू शकले नाही. 

रास्ता पेठेत इमारतीला भीषण आग; 3 फ्लॅट्स व 2 दुकानं भस्मसात