पुणे : बाणेरमध्ये इंजिनीअरिंग कंपनीच्या कार्यालयाला आग

टीम ई-सकाळ
रविवार, 2 फेब्रुवारी 2020

अग्निशमन विभागाकडून दोन बंब,व एक टँकर बोलावून ही आग साधारणतः दुपारी 3.50 च्या दरम्यान अग्निशमन विभागाकडून अथक प्रयत्न करून आटोक्यात आणण्यात आली.

पुणे बालेवाडी : बाणेरच्या मुख्य रस्त्यावरील बालेवाडी फाटा या भागात रविवारी दुपारी प्लुरल टेक्नॉलॉजी या अभियांत्रिकी कार्यालयाला मोठी आग लागली. रविवारी कार्यालयास सुट्टी असल्याने या ठिकाणी सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.आगीचे नेमके कारण अजून समजू शकले नाही. या आगीत कार्यालयाचा निम्मा भाग जळून खाक झाला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

बाणेर येथील बालेवाडी फाटा या भागात दुपारी सव्वादोनच्या सुमारास सिग्नेट कॉर्नर या इमारतीतील चौथ्या मजल्यावर असणाऱ्या प्लुरल टेक्नॉलॉजी या 4000 स्वेअर फूट च्या अभियांत्रिकी कंपनी च्या ऑफिसला मोठी आग लागली. काही वेळातच अग्निशमन विभागाकडून अग्निशमन दलाचे बंब आणि कर्मचारी हजर झाले. तोपर्यंत कार्यालयातील मधील लाकडी फर्निचर आणि कागदपत्रं यामुळे आगीने रौद्ररूप धारण केले. दुरून ही या ठिकाणच्या धुराचे लोट बाहेर पडताना दिसत होते. अग्निशमन विभागाकडून दोन बंब,व एक टँकर बोलावून ही आग साधारणतः दुपारी 3.50 च्या दरम्यान अग्निशमन विभागाकडून अथक प्रयत्न करून आटोक्यात आणण्यात आली.कार्यालयाला रविवारी सुट्टी असल्याने सुदैवाने या ठिकाणी कोणतीही जीवितहानी झाली नाही .हा बाणेर येथील वर्दळीचा चौक असल्यामुळे माहिती मिळताच पोलिस यंत्रणा, वाहतूक शाखा दल या ठिकाणी त्वरित हजर झाले. येथे अग्निशमन विभागाचे दत्तात्रय नागलकर,शिवाजी मेमाणे, फायरमन शेवाळे, अमीर खान, कमल खान,तसेच इतर सहकारी हजर होते.या आगीचे नेमके कारण अजून समजू शकले नाही. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आगीविषयी माहिती मिळताच आमच्या सहकार्‍यांसोबत आम्ही या ठिकाणी हजर झालो. साधारण अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ आम्हाला ही आग आटोक्यात आणण्यासाठी लागला,आणि त्यानंतर कुलीग साठीही वेळ लागला. पाण्याची फवारणी करून ही आग विजवन्यात आली. ऑफिस चार हजार स्वेअर फूट असून त्यापैकी अर्धा भाग या आगीच्या भक्ष्यस्थानी पडला आहे. आगीचे नेमके कारण मात्र अजून समजू शकलेले नाही.
- शिवाजी मेमाने, स्टेशन ऑफिसर पाषाण अग्निशमन केंद्र


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: fire engineering company baner pune maharashtra