
Pune Hospital Safety
Sakal
पुणे : शहरातील तब्बल ६१ रुग्णालये, तसेच दवाखान्यांनी अद्यापही आगप्रतिबंधक यंत्रणा अद्ययावत केली नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अशा रुग्णालयांना महापालिकेने नोटिसा बजावल्या असून, तातडीने त्रुटी दूर करून यंत्रणा सज्ज ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र त्यानंतरही यंत्रणा सुस्थितीत न आल्यास कारवाई केली जाणार आहे.