
Pune Fire News
Sakal
पुणे : घोरपडी परिसरातील बी. टी. कवडे रस्त्यावरील एका बंगल्यात शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची घटना मंगळवारी मध्यरात्री घडली. बंगल्यात अडकलेल्या आठ जणांची सुखरूप सुटका करण्यासाठी अग्निशामक दलाच्या जवानांना खिडक्यांचे गज तोडावे लागले. अखेर जवानांनी प्रयत्न करून सर्वांना सुखरूप बाहेर काढले.