Fire Accident : कात्रज घाटात वणवा; वनविभागाचे कर्मचारी वणवा विजविण्यासाठी कार्यरत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Fire Katraj Ghat Forest department staff are working to extinguish fire pune

Fire Accident : कात्रज घाटात वणवा; वनविभागाचे कर्मचारी वणवा विजविण्यासाठी कार्यरत

कात्रज : दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास कात्रज घाटात वणवा पेटला आहे. वनविभागाकडून पाच ते सहा कर्मचारी वणवा विजविण्यासाठी कार्यरत आहेत. मात्र, वणवा आटोक्यात आणण्यात त्यांना यश आलेले नाही. सायंकाळनंतर या वणव्याने रौद्ररुप धारण केल्याचे पाहायला मिळाले.

कात्रज घाट परिसरात सुमारे ९०० हेक्टर वनक्षेत्र आहे. मात्र याठिकाणी विविध जातीचे पशु-पक्षी असून जैवविविधतेने नटलेला हा परिसर आहे. रविवारी अनेकजण याठिकाणी फिरण्यासाठी किंवा अन्य कारणासाठी जात असतात. अशाच एखाद्या समाजकंटकाकडून हा वणवा पेटविण्यात आल्याचा अंदाज नागरिकांमधून व्यक्त करण्यात येत आहे.

दरवर्षी उन्हाळ्यात वणवा पेटण्याच्या घटना घडतात. त्यामुळे वणवा आटोक्यात आणण्यासाठी वनविभागाच्या वतीने काही अंतरावर चर खोदण्यात आलेली आहे. त्यामुळे काही प्रमाणात आग आटोक्यात आणण्यात यश येईल.

- संभाजी गायकवाड, वनरक्षक