पुण्याच्या रुग्णालयातील ऑपरेशन थिएटरमध्ये आग

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 5 September 2020

गोळीबार मैदान चौकाजवळ व पुणे कँटोन्मेंट बोर्डच्या कार्यालयासमोरच सरदार वल्लभभाई पटेल रुग्णालय आहे. या रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटरमध्ये (ओटी) शनिवारी सकाळी साडे अकरा वाजता अचानक आग लागली.

पुणे : पुणे कँटोन्मेंट बोर्डच्या सरदार वल्लभभाई पटेल रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटरमध्ये (ओटी) शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. ही घटना शनिवारी सकाळी साडे अकरा वाजता घडली.दरम्यान, अग्निशामक दलाच्या जवानांनी ही आग तत्काळ आटोक्यात आणली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

गोळीबार मैदान चौकाजवळ व पुणे कँटोन्मेंट बोर्डच्या कार्यालयासमोरच सरदार वल्लभभाई पटेल रुग्णालय आहे. या रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटरमध्ये (ओटी) शनिवारी सकाळी साडे अकरा वाजता अचानक आग लागली. या घटनेनंतर रुग्णालय प्रशासनाने तत्काळ अग्निशामक दलास खबर दिली. त्यानंतर अवघ्या काही मिनिटातच तेथे पोचलेल्या अग्निशामक दलाच्या जवानानी आग विझविण्यास सुरुवात केली.

पुणे जिल्ह्यातील ग्रामीण नागरिकांना बेडअभावी मिळेनात वेळेत उपचार

अर्धा तासानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात जवानांना यश आले, अशी माहिती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.विद्याधर गायकवाड यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fire in the operation theater of Patel Hospital Pune Cantonment