पिंपरी : थेरगावातील पेपर मिलला आग 

संदीप घिसे 
शनिवार, 25 मे 2019

मुख्य अग्निशामक अधिकारी किरण गावडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, थेरगावातील पदमजी पेपर मिलला आग लागल्याची वर्दी शनिवारी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास अग्निशामक दलास मिळाली.

पिंपरी (पुणे) : थेरगाव येथील पदमजी पेपर मिलला मोठी आग लागली. ही घटना शनिवारी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास घडली. 

मुख्य अग्निशामक अधिकारी किरण गावडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, थेरगावातील पदमजी पेपर मिलला आग लागल्याची वर्दी शनिवारी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास अग्निशामक दलास मिळाली.

त्यानुसार रहाटणी, प्राधिकरण येथील अग्निशामक मुख्यालयातील प्रत्येकी एक आणि अग्निशामक मुख्यालयातील दोन असे चार बंब घटनास्थळी दाखल झाले. ही आग पेपरच्या गठ्ठ्यांना लागल्यामुळे ती झपाट्याने वाढली. धुरामुळे आग विझविण्यात अडचणी येत आहेत. सध्या आग आटोक्‍यात आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: fire in paper mill at Pimpri