पिंपरी: कुदळवाडीतील आग सहा तासानंतर आटोक्यात 

संदीप घिसे 
सोमवार, 31 डिसेंबर 2018

महापौर राहुल जाधव यांनीही घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. या आगीत कोणीही जखमी झाले नाही. सध्या घटनास्थळी कुलींगचे काम सुरू असल्याचे अग्निशामक दलाच्या सूत्रांनी सांगितले.

पिंपरी (पुणे) : भंगाराच्या गोदामाला लागलेली आग सहा तासानंतर आटोक्यात आली. ही घटना चिखली, कुदळवाडी येथील वडाचा मळा येथे घडली.

अग्निशामक दलाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कुदळवाडी येथील वडाचा मळा परिसरात असलेल्या भंगाराच्या गोदामाला आग लागल्याची वर्दी रविवारी रात्री पावणेनऊ वाजताच्या सुमारास अग्निशामक दलास मिळाली. त्यानुसार पिंपरी अग्निशामक मुख्यालय आणि चिखली उपकेंद्र येथून प्रत्येकी एक असे दोन बंब घटनास्थळी रवाना झाले. मात्र आगीचे स्वरूप पाहता भोसरी, पिंपरी, प्राधिकरण आणि तळवडे येथील उपकेंद्राचे प्रत्येकी एक बंब घटनास्थळी दाखल झाले. मात्र काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केले. यामुळे चाकण एमआयडीसी, पुणे महापालिका तसेच खासगी कंपन्यांचे अग्निशामक बंबही मदतीसाठी बोलविण्यात आले. याशिवाय पाण्याची वाहतूक करण्यासाठी खासगी टँकरचीही मदत घेण्यात आली. तब्बल सहा तासानंतर ही आग आटोक्यात आली.

महापौर राहुल जाधव यांनीही घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. या आगीत कोणीही जखमी झाले नाही. सध्या घटनास्थळी कुलींगचे काम सुरू असल्याचे अग्निशामक दलाच्या सूत्रांनी सांगितले.

Web Title: fire in pimpri