तळेगाव ढमढेरे येथील दोन घरांना आग-जीवितहानी टळली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

fire Two houses in Talegaon Dhamdhere pune

तळेगाव ढमढेरे येथील दोन घरांना आग-जीवितहानी टळली

तळेगाव ढमढेरे : तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर ) येथील मुख्य बाजारपेठेतील व्यापारी अजय पोखर्णा व सचिन मेटे यांच्या मालकीच्या घराला आज दुपारी अचानक आग लागल्याने अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक परिश्रम करून आग आटोक्यात आणण्यात यश मिळविले. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही.तळेगाव ढमढेरे येथील मुख्य पेठेत घराला आग लागल्याने सर्वांचीच धावपळ झाली. अत्यंत उष्णता आणि गजबजलेल्या भागात घराला लागलेली आग ही मोठी दुर्घटना अग्निशमन दलाच्या जवानांनी आटोक्यात आणली.

त्यासाठी स्थानिक पाण्याचे टँकर व ग्रामस्थांनी मोठी मदत केली.आगीचे कारण अद्याप समजले नाही. जुन्या इमारतीच्या वरच्या मजल्यावर आगीचे लोट पसरले होते. स्थानिक प्रशासन, नागरिक, पोलीस व अग्निशमन दल घटनास्थळी योग्य वेळेत तातडीने दाखल झाल्याने मोठी दुर्घटना टळली. तब्बल दोन तास चाललेल्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण आणण्यात यश आले.तळेगाव ढमढेरे येथे प्रथमच आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले.

Web Title: Fire Two Houses In Talegaon Dhamdhere Pune

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top