पिंपरी: शाळेच्या सहामाही परिक्षा संपून दिवाळीच्या सुट्या लागल्या की लहानग्यांसोबतच पालक फटाके खरेदीकडे वळतात. शहरातील बहुतांश शाळांना आता दिवाळीच्या सुट्या पडलेल्या आहेत..एकीकडे घरात फराळ बनविण्याची लगबग सुरू असताना दुसरीकडे लहानगे दारात किल्ला बनविण्यात मग्न आहेत. मनासारखा किल्ला बनवून झाल्यानंतर फटाक्यांच्या खरेदीसाठी फटाक्यांच्या स्टॉलवर गर्दी होत आहे. शुक्रवारपासून वसुबारसेने दिवाळीला सुरुवात होत आहे. त्यामुळे गुरुवारी (ता.१६) फटाका स्टॉलवर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती..सुदुंबरे येथील सीबीआरएन स्पर्धेत महाराष्ट्र प्रथम.फटाक्यांमध्ये प्रकार: वात पेटवल्यावर मोराच्या आकारासारखे दिसणारे रोषणाईचे फटाके, माचिस फटाके असे फटाक्यांचे नवीन प्रकार यावर्षी पहिल्यांदाच बाजारात आले आहेत. यासोबतच दरवर्षी विकले जाणारे आपटबार, विविधरंगी फुलबाजे, भुईचक्र, पाऊस यांच्यातही मोठी व्हरायटी दिसून येत आहे. सुतळी बॉम्ब, लक्ष्मी फटाके, रॉकेट, हवाई शेल्स यांना दरवर्षी प्रमाणेच यंदाही मोठी मागणी आहे..तर पालकांकडून फुलबाजे, भुईचक्र, भुईनळे यासारख्या बिनआवाजाच्या फटाक्यांची मागणी केली जात आहे. लहान मुलांकडून आपटबार व मिसाईल गन यांची खरेदी केली जात आहेत..Pune Airport: विमान प्रवाशी ताटकळत; आंतरराष्ट्रीय प्रवाशांना ग्रीन चॅनलमधून जाण्यास मज्जाव.दरांमध्ये वाढ:यावर्षी फटाक्यांचे दर १५ ते २० टक्क्यांनी वाढलेले असून, यामध्ये रंगीबेरंगी फटाक्यांचे दर साध्या फटाक्यांपेक्षा अधिक आहेत. साध्या फुलबाज्यांच्या एका बॉक्सची किंमत २० रुपये आहे तर मल्टिकलर फुलबाजांची किंमत १०० रुपयांच्या पुढे आहे. याच प्रमाणे भुईचक्र, फ्लॉवरपॉट या फटाक्यांमध्येही साधे व मल्टिकलर अशी व्हरायटी आहे. मात्र, मल्टिकलर फटाक्यांचे आकर्षण अधिक असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. सुटे फटाके, माळा, यांचीही खरेदी केली जात आहे..अनेक शाळांना सुट्ट्या लागल्यामुळे सध्या ग्राहकांची मोठी गर्दी आहे. यावर्षी दर १५ ते २० टक्क्यांनी वाढले आहेत. मात्र, तरीही ग्राहक फटाक्यांची खरेदी करताना दिसत आहेत. आवाजाच्या रोषणाईच्या फटाक्यांसोबतच रॉकेट, आपटबार, सुतळी बॉम्ब यांना सध्या मोठी मागणी आहे. पिस्तूल व टिकल्यांऐवजी आता ‘मिसाइल गन’ची मागणी लहान मुलांकडून वाढली आहे.- सागर गरुड, फटाके विक्रेता, चिंचवडगाव.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.