

फटाक्यांच्या स्टॉलला
आगीत लाखोंचे नुकसान
श्रीगोंदे, ता. ९ : कोळगाव येथील बसस्थानकासमोरील सैनिक चौकात बापूसाहेब कर्डिले यांच्या फटाक्यांच्या स्टॉलला रविवारी (ता. ८) सायंकाळी सातच्या सुमारास अचानक आग लागली. दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाची लगबग सुरू असतानाच घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच धावपळ उडाली. या आगीत फटाक्यांसह स्टॉलमधील साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे.
बापूसाहेब कर्डिले यांचे कोळगाव बसस्थानकाच्या पूर्वेला सैनिक चौकात भाजीपाल्याचे दुकान आहे. दिवाळीनिमित्त विक्रीसाठी त्यांनी फटाके आणून दुकानासमोर स्टॉल उभारला होता. सायंकाळी अचानक या स्टॉलला आग लागली. फटाक्यांमुळे आगीने काही क्षणांतच रौद्र रूप धारण केले. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
आगीची तीव्रता लक्षात येताच परिसरातील युवकांनी तातडीने धाव घेतली. शेजारील राहुल घोंगडे यांच्या दुकानातील फटाक्यांचा साठा सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आला. राहुल चंदन यांचे कपड्यांचे दुकानही वेळीच बंद करण्यात आले. युवकांनी पाण्याची व्यवस्था करून जीव धोक्यात घालत आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली.
स्थानिक युवकांच्या सतर्कतेमुळे आग आसपासच्या दुकानांपर्यंत पोहोचण्यापूर्वीच नियंत्रणात आली. अन्यथा परिसरातील दहा ते बारा दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी पडण्याची शक्यता होती. युवकांनी दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला. या घटनेत सुदैवाने जीवितहानी झाली नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.