योग्य यंत्रणा नसल्यास वीज व पाणी पुरवठा होऊ शकतो बंद; अग्निशामन दलाला अधिकार

firefighters have Right to cut off power and water supply if no proper fire system
firefighters have Right to cut off power and water supply if no proper fire system

पुणे : अग्निशमन यंत्रणा बसविल्याशिवाय इमारतीच्या पूर्णत्वाचे प्रमाणपत्र दिले जात नाही. त्यामुळे परवानगी पुरती यंत्रणा बसवा, त्यानंतर त्याची देखभाल दुरुस्ती कशी करायची हे पाहू, अशा मानसिकतेमुळे अग्निशमन यंत्रणा निकामी झाल्याचे अनेक ठिकाणी पाहायला मिळते. गरजेच्या वेळी ही यंत्रणा उपयोगी पडत नाही व आगीच्या दुर्घटनेत मोठे नुकसान होते.

हेही वाचा - 'मेडीकल'समोरील दृश्य पाहून डॉक्टरांचेही पाणावले डोळे, पण बघ्यांच्या भूमिकेशिवाय काहीच...

अग्निशमन यंत्रणेच्या देखभाल दुरुस्तीसाठी काय करावे याबाबत ‘महाराष्ट फायर प्रिव्हेशन अॅण्ड लाइव्ह सेफ्टी मेजरमेंट अॅक्ट:२००६’मध्ये काही तरतुदी आहेत. त्यानुसार सर्व आस्थापनांना अग्निशमन यंत्रणा दुरुस्त आणि कार्यक्षम ठेवल्याबाबतचे प्रमाणपत्र मुख्य अग्निशमन अधिकारी किंवा नामनिर्देशित अधिकाऱ्यांकडे वर्षातून दोन वेळा सादर करणे आवश्‍यक आहे. कोणतीही व्यक्ती इमारतीत किंवा तिच्या भागात बसवलेले आग प्रतिबंधक आणि जीवरक्षक बिघडवणार नाही, त्यामध्ये फेरबदल करणार नाही, ते काढून नेणार नाही किंवा त्याला नुकसान पोचविणार नाही, याची काळजी घेणे गरजेचे आहे. ही सर्व जबाबदारी इमारत किंवा इमारतीच्या भागाचा मालक किंवा भोगवटादार यांची असते.

हेही वाचा - दोघांनीही बघितले सुखी संसाराचे स्वप्न, पण एक व्यसन लागलंय अन् सर्वच संपलं

वीज व पाणी पुरवठा होऊ शकतो बंद

एखाद्या ठिकाणची अग्निशमन यंत्रणा योग्य नाही याची खात्री पटल्यास अग्निशमन दल संबंधितांना नोटीस देऊ शकते. दोन ते तीन वेळा नोटीस देऊनही अग्निशमन यंत्रणेत आवश्यक बदल केले नाही, तर त्या इमारतीचा पाणी व वीज पुरवठा बंद करण्याचे अधिकार अग्निशामन दलाला आहेत. तीन वर्षांपूर्वी एका सरकारी कंपनीवर कारवार्इ करीत तेथील पाणीपुरवठा बंद करण्यात आला होता.

शहरातील अनेक आस्थापना नियमितपणे त्यांची अग्निशमन यंत्रणा योग्य प्रकारे सुरू असल्याचे प्रमाणपत्र लायसन प्राप्त एजन्सीकडून दिले जाते. भविष्यात निर्माण होणाऱ्या धोक्यांचा विचार करता सर्वच अस्थापनांनी आपल्याकडील यंत्रणा तपासणे गरजेचे आहे. याबाबत काही शंका असल्यास त्यांनी अग्निशमन दलाला संपर्क साधावा.
-प्रशांत रणपिसे, मुख्य अग्निशमन अधिकार, पुणे महानगरपालिका

या आहेत कायद्यातील तरतुदी
-अग्निशमन यंत्रणा कार्यक्षम असल्याचे प्रमाणपत्र वर्षातून दोन वेळा सादर करणे आवश्‍यक.
-कोणतीही व्यक्ती आग प्रतिबंधक आणि जीवरक्षक यंत्रणा बिघडवणार नाही याची काळजी घ्यावी.
- सुरक्षेची जबाबदारी इमारतीचा किंवा इमारतीच्या भागाचा मालक किंवा भोगवटादार यांच्यावर असते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com