Pune News : पुण्यात अग्निशमन दलाने वाचवला गर्भवती गोमातेचा जीव! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pune News

Pune News : पुण्यात अग्निशमन दलाने वाचवला गर्भवती गोमातेचा जीव!

पुणे : पुण्यात अग्निशमन दलाच्या जावानाने गर्भवती गोमातेचा जीव वाचवाल आहे. १० फुट खोल खड्ड्यात पडलेल्या गोमातेला नवीन जीवदान मिळाले आहे.

खड्ड्यात अडकलेल्या गायीला अग्निशमन दलाने सुखरूप बाहेर काढले आगे. पुण्यातील कोंढवा खुर्द भागातील ही घटना आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सुनील कटके यांनी त्यांच्याजवळ असलेले जनावरांसाठी पाणी पिण्यासाठी एक खड्डा तयार केला होता.मात्र पाणी कमी असल्याने गाय त्या ठिकाणी गेली असता तिला पाण्याचा अंदाज आला नाही आणि ती त्या १० फूट खड्ड्यात पडली. कटके यांनी तात्काळ ही माहिती अग्निशमन दलाला दिली. (Pune Latest News)

काहीच वेळात अग्निशमन दलाचे अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. गाय गर्भवती असल्याकारणाने तिला कुठली ही इजा होता कामा नये हे लक्षात घेत एक जवान त्या खड्ड्यात उतरला.

अग्निशमन दलाने दोरीचा वापर न करता पट्ट्याच्या साह्याने गायीला बाहेर काढण्यात यश मिळवले. गायीला सुखरूप बाहेर काढताच स्थानिकांनी अग्निशमन दलाचे अधिकारी आणि कर्मचारी यांचे कौतुक केले जात आहे.

टॅग्स :Pune Newspune