Pune Breaking : मार्केट यार्डात गोळीबार; दिवसाढवळ्या २८ लाखांची रोकड लुटली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pune

Pune Breaking : मार्केट यार्डात गोळीबार; दिवसाढवळ्या २८ लाखांची रोकड लुटली

पुणे : मार्केट यार्ड येथील एका अंगडिया व्यावसायिकाच्या कार्यालयात शिरलेल्या चोरट्यांनी गोळीबार करुन तब्बल २८ लाख रुपयांची रोकड लुटल्याची धक्कादायक घटना शनिवारी दुपारी घडली. दरम्यान, गोळीबाराच्या या घटनेमुळे मार्केट यार्ड परिसरात घबराट निर्माण झाली होती. (Pune crime news in Marathi)

हेही वाचा: BREAKING : जितेंद्र आव्हाडांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

मार्केट यार्ड परिसरातील एका इमारतीत अंगडिया व्यावसायिकाचे कार्यालय आहे. शनिवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास चोरटे कार्यालयात शिरले. चोरट्यांनी चेहरे कापडाने झाकले होते. चोरट्यांनी अंगडिया कार्यालयातील कर्मचाऱ्यांना पिस्तुलाचा धाक दाखविला आणि पैशांची मागणी केली. कर्मचाऱ्यांना धमकावण्यासाठी चोरट्यांनी गोळीबार केला. कार्यालयातील २८ लाख रुपयांची रोकड लुटून चोरटे पसार झाले.

हेही वाचा: Couple Without Marriage : टेन्शन नॉट! हॉटेलमध्ये गर्लफ्रेंडसोबत बिनधास्त राहा; जाणून घ्या कायदा

या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांच्या पथकाने पसार झालेल्या चोरट्यांचा माग काढण्यासाठी तातडीने नाकाबंदी करुन संशयित वाहनांची तपासणी सुरू केली. पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण तपासासाठी ताब्यात घेतले आहे.