पुणे : सिंहगड रस्त्यावर तरुणावर भरदिवसा गोळीबार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 3 फेब्रुवारी 2020

  • पुर्ववैमनस्यातुन सराईत गुन्हेगाराच्या टोळीकडून तरुणावर भरदिवसा गोळीबार 
  • दहशत निर्माण करण्यासाठी टोळक्‍याकडून वाहनांची तोडफोड 

पुणे/सिंहगड रस्ता : गॅरेजमध्ये बसलेल्या एका व्यक्तीवर सराईत गुन्हेगाराच्या टोळीतील दहा ते बारा जणांनी भरदिवसा गोळीबार केला. त्यानंतर गॅरेजमधील वाहनांची तोडफोड करून दहशत निर्माण केली. ही घटना वडगाव बुद्रुक येथील तुकाईनगरमध्ये सोमवारी दुपारी अडीच्या सुमारास घडली. सुदैवाने या गोळीबारामध्ये कोणीही जखमी झाले नाही. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पांडुरंग खंडु मोरे (वय 42,रा.नऱ्ह) असे यांच्यावर गोळीबार झाला. त्यांनी सिंहगड रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. त्यावरुन बंटी पवार, अर्जुन उर्फ आरजे विठ्ठल कांबळे, मुकुंद हिरामण राजगुरू, विशाल भांडे, राजु मोरे, प्रणव गिरी व अन्य व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बंट्या पवार हा सराई गुन्हेगार असून त्याचे व फिर्यादी मोरे याचे पूर्ववैमनस्य आहे. मोरे हा सोमवारी दुपारी अडीच वाजता वडगाव बुद्रुक येथील तुकाईनगरमध्ये असलेल्या त्याच्या आय क्रिएट कार हब या गॅरेजमध्ये काही जणांसमवेत थांबला होता. त्यावेळी बंट्या पवार याचा साथीदार कांबळे व अन्य आरोपी गॅरेजमध्ये आले. कांबळे याने त्याच्याकडील पिस्तुलमधील फिर्यादीवर गोळीबार केला. मात्र मोरे व तेथे थांबलेल्यांनी तेथील कारच्या पाठीमागे लपून गोळी चुकविली. दरम्यान, पवार व त्याचे साथीदार कोयते घेऊन फिर्यादीस मारण्यासाठी आले. त्यांनी गॅरेजमधील कारची तोडफोड करीत दहशत निर्माण केली. तसेच फिर्यादी हे आरोपींना ओळखतील, म्हणून आरोपींनी तेथून पळ काढला.

अंडरवेअरमध्ये मोबाईल लपवून परिक्षेत करायचा कॉपी; मग...

दरम्यान, अचानक गोळीबार झाल्याने गोंधळ उडून नागरीकांमध्ये घबराट पसरली. या घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त स्वप्ना गोरे यांच्यासह वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिसराची पाहणी केली आहे. बंट्या पवार व पांडुरंग मोरे यांच्या पूर्ववैमस्यातुन काही महिन्यांपुर्वीच तुकाईनगरमध्ये वाहनांच्या तोडफोडीचे प्रकार घडले आहेत.

भारताचा विकासदर राहणार एवढा; फिच रेटिंग्सचे अनुमान

बंटी पवार याचे नातेवाईक गांजा विक्री करतात अशी माहिती पांडुरंग मोरे याने पोलिसांना दिली. त्यावरुन पोलिसांनी बंट्या पवार याच्या नातेवाईकाला अटक केली. असा समज करून बंटी पवार व त्याच्या साथीदारांनी रागाच्या भरात गोळीबार व वाहनांची तोडफोड केली. या घटनेचा तपास सिंहगड पोलिस करीत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: firing on youth on Sinhagad road in Pune