अंडरवेअरमध्ये मोबाईल लपवून परिक्षेत करायचा कॉपी; मग...

सकाळ वृत्तसेवा
Monday, 3 February 2020

बिहारमध्ये शिपाई पदासाठी परीक्षा देण्यासाठी आलेल्या एका तरुणाने चक्क अंडरवेअरमध्ये मोबाईल आणि टोपीखाली ब्लूटुथ लपवून कॉपी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या तरुणाने कॉपी करण्यासाठी केलली कल्पना ही सध्या चर्चेचा विषय आहे. त्याने केलेली कल्पना मात्र पर्यवेक्षकांच्या नजरेतून सुटली नाही.

पटना : बिहारमध्ये शिपाई पदासाठी परीक्षा देण्यासाठी आलेल्या एका तरुणाने चक्क अंडरवेअरमध्ये मोबाईल आणि टोपीखाली ब्लूटुथ लपवून कॉपी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या तरुणाने कॉपी करण्यासाठी केलली कल्पना ही सध्या चर्चेचा विषय आहे. त्याने केलेली कल्पना मात्र पर्यवेक्षकांच्या नजरेतून सुटली नाही.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

परीक्षा देणारा हा तरुण जमुईमधील लक्ष्मीपूर इथला रहिवासी आहे. हा तरुण शिपाई पदाच्या परीक्षेसाठी इंद्रस्थली बालिका उच्च विद्यालयात बसला होता. प्रश्न पत्रिका मिळाल्यानंतर काही वेळ तो तसाच शांत बसून राहिला. मात्र काही वेळाने वर्गात असलेल्या शिक्षकांसह पर्यावेक्षकांना त्याच्या हालचालीवर शंका आली. त्यांनी तरुणाला जागेवरून उठवत त्याची झडती घेतली पर्यावेक्षकांनी घेतलेल्या झडतीमध्ये तरुणाच्या अंडरवेअरमध्ये मोबाईल तर डोक्यावरील टोपीमध्ये ब्लूटुथ सापडले.

पाकिस्तानीच म्हणतात, 'सरकार लाज वाटू द्या, भारताकडून काहीतरी शिका'

त्या तरूणाची कसून चौकशी केल्यानंतर तरुण फोनवर प्रश्न सांगत असल्याचं आणि पलिकडून फोनवर कोणीतरी अज्ञात व्यक्ती उत्तर सांगत असल्याची धक्कादायक बाब समोर आली. ह्या प्रकरणाची तक्रार दीघा पोलिसात करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू आहे. हा संपूर्ण प्रकार घडल्यानंतर तरुण प्रश्नपत्रिका घेऊन फरार झाला. तर परीक्षा केंद्रावर कडेकोट सुरक्षा व्यवस्था असतानाही तरुण मोबाईल, ब्लूटुथ परीक्षा हॉलमध्ये घेऊन आला कसा हा प्रश्न सध्या उपस्थित केला जात आहे.

मैलापाण्यात काम करणारे घेणार मोकळा श्वास; कारण...

तत्पूर्वी, परीक्षा केंद्रात कॉपी होण्याची गोष्ट नवीन नसली तरी वेगवेगळ्या मार्गानं कॉपी होत असते. परंतु, या विद्यार्थ्याने केलेली कृती सध्या सगळीकडेच चर्चेचे कारण बनली आहे. या तरुणाने कॉपी करण्याची भन्नाट कल्पना शोधून काढली परंतु ती पकडली गेली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: With Phone In Underwear bihar Student Caught Cheating In Class