बारावी परीक्षेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थी-पालकांची वाहतुक कोंडीने घेतली "परीक्षा'

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 फेब्रुवारी 2020

काही केल्या कोंडीतून वाट निघेना तेव्हा भेदरलेल्या श्‍वेताने पायीच परीक्षा केंद्र गाठायचा प्रयत्न केला; मात्र वेळेत न पोचण्याच्या भीतीने ती पुन्हा गाडीवर बसली. शेवटी 40-45 मिनिटांनी रस्ता थोडाफार मोकळा झाला अन ती परीक्षा केंद्रात पोचली.

पुणे : अप्परमधील श्‍वेता (नाव बदलेले आहे) बारावीच्या परीक्षेचा पहिलाच दिवस असल्याने मंगळवारी सकाळी घरातून वेळेत निघाली. पण, रस्त्यांवरील वाहतूक कोंडीत ती आणि तिचे पालक अडकले, ते 40 मिनिटे. काही केल्या कोंडीतून वाट निघेना तेव्हा भेदरलेल्या श्‍वेताने पायीच परीक्षा केंद्र गाठायचा प्रयत्न केला; मात्र वेळेत न पोचण्याच्या भीतीने ती पुन्हा गाडीवर बसली. शेवटी 40-45 मिनिटांनी रस्ता थोडाफार मोकळा झाला अन ती परीक्षा केंद्रात पोचली. हि सद्यस्थिती आहे, शैक्षणिक माहेरघर असलेल्या..पण वाहतुक कोंडीत अडकलेल्या पुण्याची ! 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

श्‍वेता व तिच्या पालकांसारख्या हजारो विद्यार्थी-पालकांना हा कटु अनुभव आला. मंगळवारपासून बारावीच्या परीक्षेला सुरूवात झाली. सकाळी अकरा वाजता पहिला पेपर बहुतांश विद्यार्थी आपल्या पालकांसमवेत एक ते दिड तास आगोदर घरातून निघाले. परंतु ठिकठिकाणची रस्ते खोदाई, रस्ता रुंदीकरणाची कामे, रस्त्यावर पडलेला राडारोड्यामुळे वाहतुक कोंडी झाली होती. अनेक ठिकाणी वाहतुक पोलिस नसल्याने वाहतुक कोंडीत अधिक भर पडली. त्यामध्ये विद्यार्थी व पालक अडकले. परीक्षेला पोचू की नाही, याची धाकधुक विद्यार्थ्यांना होती. वाहतुक कोंडीमुळे बराच उशीर होऊ लागल्याने काही विद्यार्थ्यांना रडु कोसळले. एकूणच मंगळवारी वाहतुक कोंडीने विद्यार्थी-पालकांचीच परीक्षा घेतल्याचे चित्र होते. त्याबाबत अनेक पालकांनी विद्यार्थी पालकांनी नाराजी व्यक्त केली. 

काँग्रेसच्या 'या' दिग्गज नेत्याची होणार चौकशी; चारशे कोटींचे प्रकरण

पार्कींगसाठीही तारेवरची कसरत 
अखेर तासाभराने विद्यार्थी कसेबसे परीक्षा केंद्रात पोचले. त्यानंतर पालकांना त्यांची वाहने पार्कींग करण्यासाठी पुन्हा तारेवरची कसरत करावी लागली. पोलिसांच्या कारवाईच्या भितीपोटी अनेक पालक भर उन्हात आपापल्या गाड्यांवरच बसून राहील्याचे चित्र अनेक ठिकाणी दिसत होते. 

इथे होती वाहतुक कोंडी 
अप्पर इंदिरानगर, निलायम चित्रपटगृहाजवळील उड्डाणपुल, दांडेकर पुलापासून मध्यवर्ती भागातील स.प.महविद्यालय, नूमवी, रेणुका स्वरुप प्रशाला, भावे स्कूल या ठिकाणी विद्यार्थी पालकांना वाहतुक कोंडीचा सामना करावा लागला. याबरोबरच नवी पेठेतील लाल बहादूर शास्त्री रस्ता, वैकुंठ स्मशानभुमी व गांजवे चौकाकडून गरवारे महाविद्यालय परिसरातही वाहतुक कोंडी होती. 

"बारावीची परीक्षा केंद्र ज्या-ज्या ठिकाणी आहेत, त्या सर्व ठिकाणांभोवतीची वाहतुक सुरळीत राहील. यादृष्टीने वाहतुक शाखा प्रयत्न करेल. विद्यार्थ्यांचे कोणत्याही प्रकारे नुकसान होणार नाही, याचा काळजी घेऊ.'' संजय शिंदे, अतिरीक्त पोलिस आयुक्त, वाहतुक शाखा. 

"माझ्या मुलीचा आज बारावीचा पेपर होता. मात्र वाहतुक कोंडीमुळे आम्हाला परीक्षा केंद्रावर वेळेत पोचता आले नाही. मुळात दहावी व बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक काही महिने आगोदर जाहीर होते. त्यादृष्टीने महापालिकेने विकासकामांचे व पोलिसांनी वाहतुक सुरळीत राहील, याची दक्षता घ्यायला पाहीजे. केवळ निधी संपवायचा म्हणून परीक्षेच्या काळात विकास कामे करण्याचा अट्टाहास करणे चुकीचे आहे.'' - अजय नाईक, दिग्दर्शक, मराठी चित्रपट. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: first day of 12th Exam heavy traffic