तृतीय पंथीयांसाठी पुण्यात पहिले हॉस्पिटल

Doctor
Doctor

कोथरूड - तृतीय पंथीयांसाठीचे पुण्यातील पहिले रुग्णालय कोथरूडमधील वेदभवनजवळ सुरू झाले आहे. फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया या धर्मादाय संस्थेच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या या रुग्णालयात तृतीय पंथीयांची मोफत तपासणी व उपचार करण्यात येणार आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

प्रा. सागर शेडगे, फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन इंडियाच्या सचिव गीतांजली देशपांडे, व्यवस्थापक प्रवीण सोनवणे यांच्या हस्ते  रुग्णालयाचे उद्घाटन करण्यात आले. दर सोमवारी सायंकाळी ६ ते ८ या वेळात तृतियपंथीयांना एचआयव्ही, तसेच विविध तपासण्या व उपचारांची येथे मोफत सोय करण्यात आली आहे. 

पुणे शहरात सुमारे पाच हजार तृतीयपंथी असून संस्थेच्या संपर्कात १४६ तृतीयपंथी आहे. संस्थेतर्फे वस्ती पातळीवर फिरता दवाखाना सुरू होता, परंतु समाजाची गरज लक्षात घेऊन कोथरूडमध्ये रुग्णालय सुरू करण्यात आले. साई एज्युकेशन ट्रस्टच्या वतीने दहावी बारावी वा इतर शिक्षण घेवू इच्छिणा-या तृतीयपंथीयांना शैक्षणिक मदत करण्यात येणार असल्याचे प्रा. शेडगे यांनी या वेळी सांगितले. अर्चना ससारे यांनी सूत्रसंचालन केले. 

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com