Leopard Cat : कात्रज प्राणिसंग्रहालयात ‘लेपर्ड कॅट’चे प्रजनन; राज्यातील पहिली घटना, दोन नर, एका मादीचा समावेश
Katraj Zoo : कात्रज येथील राजीव गांधी प्राणिसंग्रहालयात दुर्मीळ ‘लेपर्ड कॅट’चे राज्यातील पहिल्यांदाच यशस्वी प्रजनन झाले आहे. ऑक्टोबर २०२४ मध्ये एका मादीने पिल्लाला जन्म दिला असून, हे पुण्यासाठी वन्यजीव संवर्धनातील महत्त्वाचे यश आहे.
कात्रज: राजीव गांधी प्राणिसंग्रहालयात दुर्मीळ ‘लेपर्ड कॅट’ (वाघाटी मांजर) वन्यजीव प्रजातीचे यशस्वी प्रजनन झाले आहे. ऑक्टोबर २०२४ मध्ये एका मादी ‘लेपर्ड कॅट’ने एका सुंदर पिल्लाला जन्म दिला. आता ते पिल्लू सहा ते सात महिन्यांचे आहे.