deepak jagtap
sakal
माळशिरस - आपल्या प्रेयसीशी लग्न केले म्हणून एका महिलेच्या पहिल्या प्रियकराने राग मनात धरून तिच्या पतीच्या डोक्यात कोयत्याने वार करून निर्घृण खून केल्याची घटना माळशिरस (ता. पुरंदर) येथे घडली. याप्रकरणी जेजुरी पोलिस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून तो फरार आहे. त्याला पकडण्यासाठी जेजुरी पोलिसांनी पथके रवाना केली आहेत.