
आंबेठाण : स्मार्ट ग्राम म्हणून ओळख मिळविलेल्या वराळे ( ता.खेड ) गावच्या सरपंच पूजा विश्वास बुट्टेपाटील यांना भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय उत्कृष्ट सरपंच पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.नवी दिल्ली येथे झालेल्या कार्यक्रमात हा पुरस्कार केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते देण्यात आला.दिल्ली येथे पुरस्कार घेणाऱ्या गावातील पहिल्या सरपंच आहेत.