Global Guruji : ‘ग्लोबल गुरुजी’साठी निवड प्रक्रियेचा पहिला टप्पा पूर्ण; तेरा केंद्रांवर १,१८७ शिक्षकांची निवड परीक्षा

पुणे जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिक्षणाची गुणवत्ता वाढविण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या ‘ग्लोबल गुरुजी’ उपक्रमाला शिक्षकांचा प्रतिसाद मिळाला.
Teacher

Teacher

sakal 

Updated on

पुणे - जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिक्षणाची गुणवत्ता वाढविण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या ‘ग्लोबल गुरुजी’ उपक्रमाला शिक्षकांचा प्रतिसाद मिळाला आहे. या उपक्रमासाठी शिक्षकांच्या निवडीच्या प्रक्रियेतील पहिला टप्पा पूर्ण झाला असून, जिल्ह्यातील १३ परीक्षा केंद्रांवर एक हजार १८७ शिक्षकांनी निवड परीक्षेत सहभाग घेतला. निवड झालेल्या शिक्षकांना सिंगापूर येथील शिक्षण व्यवस्थेचा अभ्यास करण्याची संधी मिळणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com