esakal | कोरोनाचा हाहाकार! पुणे जिल्ह्यात पहिल्यांदाच ४ हजारांचा आकडा पार अन् योगायोग म्हणजे...
sakal

बोलून बातमी शोधा

Corona_Test

कोरोनाचे नवे रुग्ण आणि रुग्णांच्या मृत्यूंची संख्या ही शुक्रवारी (ता.२८) रात्री ९ वाजल्यापासून शनिवारी (ता. २९) रात्री नऊ वाजेपर्यंतची आहे.

कोरोनाचा हाहाकार! पुणे जिल्ह्यात पहिल्यांदाच ४ हजारांचा आकडा पार अन् योगायोग म्हणजे...

sakal_logo
By
गजेंद्र बडे

पुणे : पुणे जिल्ह्यात गेल्या पावणेसहा महिन्यांच्या कालावधीत शनिवारी (ता.२९) पहिल्यांदाच एका दिवसात नवीन कोरोना रुग्णांचा चार हजारांचा आकडा पार झाला आहे. दिवसभरात तब्बल चार हजार ७० रुग्ण आढळून आले आहेत. योगायोग म्हणजे आजच रुग्णांच्या एकूण मृत्यूंचाही चार हजारांचा आकडा ओलांडला गेला आहे.

शुक्रवारच्या (ता.२८) तुलनेत शनिवारी ४५९ रुग्ण वाढले आहेत. शुक्रवारी हाच आकडा ३ हजार ६११ इतका होता. दरम्यान, शनिवारी दिवसभरातील एकूण रुग्णांमध्ये पुणे शहरातील १ हजार ९६८ रुग्णांचा समावेश आहे. 

Video : पुणे पोलिसांच्या 'प्लाझ्मादान'मुळे वाचताहेत कोरोना रुग्णांचे जीव!​

पुणे शहरातील सर्वाधिक रुग्णांबरोबरच शनिवारच्या रुग्णांत पिंपरी-चिंचवडमधील १ हजार १४४, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील ६५५, नगरपालिका क्षेत्रातील २३३ आणि कॅंटोन्मेंट बोर्डाच्या कार्यक्षेत्रातील ७० जणांचा समावेश आहे.

दरम्यान, दिवसभरात ७३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्यांमध्ये पुणे शहरातील सर्वाधिक ४६ रुग्ण आहेत. पिंपरी चिंचवडमधील १०, जिल्हा परिषद क्षेत्रातील १५, नगरपालिका आणि कॅंटोन्मेंट बोर्डाच्या कार्यक्षेत्रातील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. कोरोनाचे नवे रुग्ण आणि रुग्णांच्या मृत्यूंची संख्या ही शुक्रवारी (ता.२८) रात्री ९ वाजल्यापासून शनिवारी (ता. २९) रात्री नऊ वाजेपर्यंतची आहे.

यामुळे जिल्ह्यातील आजअखेरपर्यंतच्या एकूण कोरोना रुग्णांची संख्या आता १ लाख ६४ हजार ५२५, कोरोनामुक्त रुग्णांची एकूण संख्या १ लाख २६ हजार ९४९ तर  रुग्णांच्या मृत्यूंची संख्या ४ हजार १० झाली आहे. मृत्यू झालेल्यांमध्ये पुणे जिल्ह्याबाहेरील ११२ रुग्णांचा समावेश आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

loading image