
पुणे : अखेर पहिली ते सातवीची उद्यापासून होणार शाळा सुरू
पुणे - शहरात ओमिक्रॉन विषाणूनचा धोका लक्षात घेऊन इयत्ता १ली ते ७वी पर्यंतची शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्याचे महापालिकेने टाळले होते. पण गेल्या काही दिवसांपासून शहरात ओमिक्रॉनचे रुग्ण नसल्याने व कोरोनाची साथही नियंत्रणात असल्याने गुरुवारपासून (ता. १६) १ ली ते ७ वीचे वर्ग सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. महापालिका प्रशासनाने याबाबत आज (ता. १४) आदेश काढले आहेत.
यांदर्भात आज उपमुख्यमंत्री अजित पवार, महापौर मुरलीधर मोहोळ, विभागीय आयुक्त सौरभ राव, महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांची बैठक झाली, त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, राज्यातील आणि शहरातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने इयत्ता ८ वीपासून पुढील शाला, महाविद्यालये सुरू करण्यात आले आहेत. तसेच ग्रामीण भागात पहिली ते चौथीचे वर्गही सुरू झाले आहेत. पण शहरी भागातील प्राथमिक शाळा सुरू झालेल्या नव्हत्या. १ डिसेंबरपासून हे वर्ग सुरू करण्याची मान्यता शासनाने दिली होती.
हेही वाचा: NDA परीक्षेसाठी 1.77 लाख महिलांनी भरला अर्ज; लष्करात होणार भरती
पुणे महापालिकेने कोरोनाच्या ओमिक्रॉन या विषाणूच्या भीतीने इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतची शाळा सुरू करण्यास १५ डिसेंबरपर्यंत स्थगिती दिली होती. तो पर्यंत आढावा घेऊन पुढील निर्णय घेतला जाईल असे सांगण्यात आले होते. त्यानुसार आज हा निर्णय घेण्यात आला. शाळा सुरू करण्यापूर्वी सर्व वर्ग खोल्या व परिसर निर्जंतुकीकरण करावे. शाळेत सोशल डिस्टंसिंगचं पालन करावे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याची योग्य पद्धतीने काळजी घ्यावी व त्यासाठीची व्यवस्था तयार करून गुरुवारपासून शाळा सुरू करता येणार आहेत.
'शहरातील १ली ते ७वी पर्यंतचे वर्ग सुरू करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, विभागीय आयुक्त, महापालिका आयुक्त यांच्यासोबत फोनद्वारे चर्चा करण्यात आली. त्यामध्ये शहरातील स्थिती चांगली असल्याने गुरुवारपासून शाळा सुरू करण्याबाबत एकमत झाले. त्यानुसार हे आदेश काढले आहेत.’
- मुरलीधर मोहोळ, महापौर
Web Title: First To Seventh Standard School Start Tomorrow
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..