esakal | हॉकीपटूंचा फिटनेसचा सराव; मेजर ध्यानचंद स्टेडियमवरील प्रकार
sakal

बोलून बातमी शोधा

Hockey-Stadium

मागील २ आठवड्यांहून अधिक काळापासून राज्यात सर्वत्र लॉकडाऊन चालू आहे. त्यामुळे, पालिकेने सर्व मैदाने, क्रीडा संकुले खेळाडूंसाठी बंद ठेवली आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पालिकेच्याच दत्तक योजनेतील १० ते १५ खेळाडू स्टेडियमवर येऊन फिटनेसचा सराव करत आहेत.

हॉकीपटूंचा फिटनेसचा सराव; मेजर ध्यानचंद स्टेडियमवरील प्रकार

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पिंपरी - नेहरू नगर येथील मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियमच्या आवारात पालिकेच्या दत्तक योजनेतील १० ते १५ खेळाडू दररोज फिटनेसचा सराव करत असल्याचे दिसून येत आहे. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मागील २ आठवड्यांहून अधिक काळापासून राज्यात सर्वत्र लॉकडाऊन चालू आहे. त्यामुळे, पालिकेने सर्व मैदाने, क्रीडा संकुले खेळाडूंसाठी बंद ठेवली आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पालिकेच्याच दत्तक योजनेतील १० ते १५ खेळाडू स्टेडियमवर येऊन फिटनेसचा सराव करत आहेत. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे स्टेडियम विक्रम पिल्ले हॉकी अकादमी ला चालविण्यासाठी देण्यात आले आहे. मात्र, लॉकडाऊन लागू होण्यापूर्वी स्टेडियममधील खराब पॉलिग्रास मॅट बदलण्याचे काम चालू होते. मात्र, त्यानंतर, ते बंद ठेवण्यात आले. मॅट नसल्याने व लॉकडाऊन लागू झाल्याने अकादमीच्या खेळाडूंचाही दैनंदिन सराव बंद झाला आहे. मात्र, पालिकेच्या दत्तक योजनेतील खेळाडूंकडून तेथील व्यायाम शाळेचा वापर केला जात आहे. अशा वेळेस कोरोनाचा प्रादुर्भाव मुलांना झाल्यास त्याला जबाबदार कोण? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे. 

पालिकेचे सहाय्यक आयुक्त (क्रीडा) संदीप खोत म्हणाले, "लॉकडाऊन मुळे पालिकेची सर्व मैदाने, क्रीडा संकुले आणि जलतरण तलाव बंद आहेत. हॉकी स्टेडियम येथे कोणी खेळाडू सराव करत असल्यास ते तपासून पाहिले जाईल. तसेच पुढील कार्यवाही केली जाईल."

loading image
go to top