
दोंदे गावात आतापर्यंत एकूण 17 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. स्थानिक संपर्कातून कोरोनाचा संसर्ग वाढू नये व समूह संसर्गाला प्रतिबंध म्हणून जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांच्या सूचनेनुसार जिल्हास्तरावर अॅक्टिव्ह सर्व्हेलन्स उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत दोंदे येथे ग्रामपंचायत व प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्यावतीने गावातील सर्वच्या सर्व म्हणजे साडेतीन हजार नागरिकांची घरोघरी जावून आरोग्य तपासणी करण्यात आली.
घरोघरी तपासणीतून दोंदे येथे 'एवढे' टक्के ग्रामस्थ संशयित
कडूस : दोंदे (ता.खेड) येथे अॅक्टिव्ह सर्व्हेलन्स' उपक्रमांतर्गत साडेतीन हजार ग्रामस्थांची घरोघरी जाऊन आरोग्य तपासणी करण्यात आली. यातून 189 संशयित रुग्ण आढळून आले आहेत. या सर्वांची प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना अँटीजन टेस्ट करण्यात येणार असल्याची माहिती प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. किरण कलमुरगे व ग्रामसेवक निलेश पांडे यांनी दिली.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
दोंदे गावात आतापर्यंत एकूण 17 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. स्थानिक संपर्कातून कोरोनाचा संसर्ग वाढू नये व समूह संसर्गाला प्रतिबंध म्हणून जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांच्या सूचनेनुसार जिल्हास्तरावर अॅक्टिव्ह सर्व्हेलन्स उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत दोंदे येथे ग्रामपंचायत व प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्यावतीने गावातील सर्वच्या सर्व म्हणजे साडेतीन हजार नागरिकांची घरोघरी जावून आरोग्य तपासणी करण्यात आली. दोन दिवसांच्या या विशेष सर्वेक्षण मोहिमेत गावातील स्वयंसेवक तरुणांसह भैरवनाथ विद्यालयाचे शिक्षक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक, आशा स्वयंसेविका व आरोग्य कर्मचारी सहभाग झाले होते. सर्व ग्रामस्थांची ऑक्सिमिटरद्वारे शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण व टेंपरेचर गन'द्वारे शरीराच्या तापमानासह अन्य आजारांची नोंद घेण्यात आली. यात 189 ग्रामस्थांची ऑक्सिजन पातळी 95 टक्के पेक्षा कमी आढळून आली. या सर्वांची कडूसच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना रॅपिड अँटिजेन टेस्ट करण्यात येणार आहे.
मराठा आरक्षणावरून शासनाचाच 'गोंधळात गोंधळ'; सुधारित आदेश काढल्याने विद्यार्थ्यांना मिळाला दिलासा
ग्रामपंचायत प्रशासक एस.एन.महंकाळे, ग्रामसेवक निलेश पांडे, वैद्यकीय अधिकारी डॉ.किरण कलमुरगे यांच्या मार्गदर्शनाखाली व आरोग्यसेवक प्रशांत फुगे, कारले यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या विशेष सर्वेक्षणात स्वयंसेवक म्हणून माजी सरपंच चंद्रकांत बारणे, सिद्धार्थ कोहिणकर, बाळासाहेब कोहिणकर, सुधीर बारणे, अनिल बारणे, हनुमंत अभंग, अतुल चौधरी, स्वप्नील म्हेत्रे, सचिन दरेकर, आकाश कोहिणकर, विशाल बारणे, मुकुंद गरगोटे, निलेश बारणे, सचिन टाकळकर, अशोक सुकाळे, संतोष कोळी, दिलीप काळे आदी तरुणांनी सहभाग घेतला.
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी : शैक्षणिक शुल्क होणार कमी? समितीच्या अहवालाकडे सर्वांचे लक्ष
Web Title: Five And Half Percent Villagers Donde Suspects House House Testing
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..