चास कमान धरणाची पाचही वक्र दारे उघडली; नागरिकांना सतर्कतेचा ईशारा

चास-कमान धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असून गेल्या काही दिवसात पावसाचा जोर आणखीन वाढल्याने धरणाचे पाचही दरवाजे शनिवारी उघडण्यात आले.
Chas kaman Dam
Chas kaman DamSakal
Summary

चास-कमान धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असून गेल्या काही दिवसात पावसाचा जोर आणखीन वाढल्याने धरणाचे पाचही दरवाजे शनिवारी उघडण्यात आले.

चास - खेड तालुक्याच्या पश्चिम पट्यात गेली काही दिवसांपासून पावसाचा जोर कायम असून शनीवार ता. 16 रोजी चास कमान धरणाचा पाणीसाठा 90.98टक्यांवर ( 6.89 टीएमसी. ) वर पोहोचल्याने खबरदारीचा उपाय म्हणून धरणाचे पाचही दरवाजे उघडण्यात आले असून एकुण पाच दरवाज्याव्दारे 4295 क्युसेक्स वेगाने पाणी भिमा नदि पात्रात सोडण्यात येत आहे. पावसाचा जोर पाहता धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा विसर्ग वाढविण्यात येणार असल्याने नदिकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा ईशारा देण्यात आला असल्याची माहिती शाखा अभियंता उत्तम राऊत तसेच महेंद्र गायकवाड यांनी दिली आहे.

चास-कमान धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असून गेल्या काही दिवसात पावसाचा जोर आणखीन वाढल्याने धरणाचे पाचही दरवाजे शनिवारी उघडण्यात आले. या एकुण पाच दरवाज्याव्दारे 4295 क्युसेक्स वेगाने पाणी नदिपात्रात सोडण्यात येत आहे असून आवक 5500 क्युसेक्स आहे. विशेष बाब म्हणजे चालू वर्षी पहिल्यांदाच धरणातून पाण्याचा विसर्ग करताना पाचही दारे उघडण्यात आली हे विशेष. मागील वर्षी ४ ऑगष्ट रोजी पहिल्यांदा धरण भरल्याने धरणाचे दरवाजे उघडण्यात आले होते.

मात्र चालू वर्षी धरणातील पाणीसाठा शंभर टक्कयाकडे झेपावला असून खबरदारीचा उपाय म्हणून धरणाची पाचही वक्र दारे उघडून भिमा नदिपात्रात विसर्ग सुरू झाला आहे. मागील वर्षी १६ जुलै रोजी धरणात फक्त २०.९९ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. धरणात येणारी पाण्याची सरासरी आवक 5500 क्युसेक्स असून धरण परिसरात एक जुनपासून ५१७ मीमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. धरणात ९ जुलै रोजी १३.७६ टक्के, १० जुलै रोजी १९.१९ टक्के, ११ जुलै रोजी २६.७६ टक्के, १२ जुलै रोजी ३९.४८ टक्के, १३ जुलै रोजी ४७. ६९ टक्के तर १४ जुलै रोजी धरणात ७१.३९ टक्के, १६ जुलै रोजी ९०.९८ असा पाणीसाठा वाढला आहे. धरणाच्या पाणीपातळीवर भिवसेन गुंडाळ, बाबाजी कडलग, ज्ञानेश्र्वर हुले, सुधाकर तनपूरे, बाळासाहेब कदम, बाबाजी शिंदे हे कर्मचारी लक्ष ठेवून आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com