धक्कादायक, खेडमध्ये कोरोनाने पाच जणांचा मृत्यू

corona1
corona1

राजगुरूनगर (पुणे) : खेड तालुक्यात कोरोनाचा कहर सुरूच असून, आज ६२ कोरोनाबधित आढळले. एकूण रुग्णसंख्या १६७० झाली आहे. तालुक्यात आज पाच मृतांची नोंद झाली, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. बी. बी. गाढवे यांनी दिली.

खेड तालुक्यात कोरोनाबधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून नियमितपणे मृतांचीही संख्या वाढत आहे. महाळुंगे येथील ६५ वर्ष वयाच्या ज्येष्ठाचा ४ जुलै रोजी मृत्यू झाला. चाकण येथील ५० वर्ष वयाच्या आणि आळंदी येथील ६० वर्ष वयाच्या प्रौढांचे ५ जुलै रोजी निधन झाले. तर, रौंधळवाडी येथील ७० वर्ष वयाच्या ज्येष्ठ महिलेचे आणि वाडा येथील ६८ वर्ष वयाच्या ज्येष्ठांचे आज निधन झाले. 

खेड तालुक्यात गेल्या चोवीस तासात चाकणला ११, आळंदीत ९ आणि राजगुरूनगरला ६ रूग्णांची भर पडली. तालुक्याच्या ग्रामीण भागात ३६ रुग्ण सापडले. खराबवाडीत तब्बल १२, सोळू येथे ५ आणि शेलपिपंळगावात ५ रूग्ण आढळून आले. केळगाव, निघोजे, निमगाव आणि रासे या ठिकाणी प्रत्येकी दोन रूग्ण आढळले. तर राक्षेवाडी, तुकाईवाडी, महाळुंगे, सांगुर्डी, मेदनकरवाडी आणि येलवाडी, येथे प्रत्येकी एक रूग्ण आढळून आला आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com