esakal | लोकसभेत सर्वाधिक उपस्थिती असलेले हे आहेत महाराष्ट्रातील टॉप फाईव्ह खासदार
sakal

बोलून बातमी शोधा

five member of parliament has most attended loksabha

नाशिकचे शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे यांची लोकसभेतील कामकाजात 93 टक्के उपस्थिती होती, असे लोकसभेच्या कामकाजातील नोंदीमधून दिसून आले आहे. 

लोकसभेत सर्वाधिक उपस्थिती असलेले हे आहेत महाराष्ट्रातील टॉप फाईव्ह खासदार

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

पुणे : नागरिकांनी निवडून दिल्यावर लोकसभेत 100 टक्के उपस्थित राहणाऱयांत महाराष्ट्रातील गोपाळ शेट्टी, मनोज कोटक यांचा समावेश झाला आहे. तर, कपिल पाटील, सुनील मेंडे आणि हेमंत गोडसे यांनीही 92 टक्क्यांपेक्षा जास्त उपस्थिती लावली आहे. 17 व्या लोकसभेच्या 80 दिवसांच्या कामकाजांच्या नोंदीतून हे दिसून आले आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघातील खासदार गोपाळ शेट्टी, मुंबई उत्तर-पूर्व लोकसभा मतदारसंघातील खासदार मनोज कोटक यांची लोकसभेच्या दैनंदिन कामकाजात 100 टक्के उपस्थिती आहे. हे दोघेही भाजपचे खासदार आहेत. तर देशातील 26 खासदारांनी 100 टक्के उपस्थितीचे उद्दिष्ट साध्य केले आहे. भिवंडीचे भाजपचे खासदार कपिल पाटील यांनी 95 टक्के, भंडारा- गोंदीयातील भाजपचे खासदार सुनील मेंढे यांनी 93 टक्के तर नाशिकचे शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे यांची लोकसभेतील कामकाजात 93 टक्के उपस्थिती होती, असे लोकसभेच्या कामकाजातील नोंदीमधून दिसून आले आहे. 

आणखी वाचा - आमच्या पुण्यात चिनी इलेक्ट्रिक बस नकोच!

मागच्या लोकसभेत (2014-19) उपस्थितीचे सरासरी प्रमाण 68 टक्के होते. यंदाच्या लोकसभेतील पहिल्या वर्षांत हे प्रमाण 77 टक्के झाले आहे. तसेच लोकसभेत 100 उपस्थिती असलेले देशात 26 खासदार आहेत. लोकसभेतील सरासरी उपस्थितीच्या प्रमाणात पहिल्या वर्षी झालेली 10 टक्के वाढ, ही लोकशाहीच्या दृष्टिने आशादायक बाब आहे. लोकसभेतील उपस्थितीवर बहुतक राजकीय पक्षांनी यंदा लक्ष केंद्रीत केले आहे. भाजपने त्यासाठी तर खास आदेशच काढलेले आहेत. खासदारांनी लोकसभेच्या कामकाजात सहभाग घ्यावा, यासाठी राजकीय पक्षांनी प्रशिक्षण वर्गही आयोजित केले होते. परिणामी सरासरी उपस्थितीचे प्रमाण वाढलेले दिसत आहे.

आणखी वाचा - 50 वर्षांपासूनचा बारामती पॅटर्न आहे तरी काय?

पुण्यातील परिवर्तन या स्वयंसेवी संस्थेने ऑनलाईन पत्रकार परिषदेत या बाबतची माहिती सोमवारी सकाळी दिली. लोकसभेतील अपडेटसची 31 मे पर्यंतची दखल संस्थेने घेतली आहे, अशी माहिती परिवर्तनच्या अध्यक्ष अंकिता अभ्यंकर, समन्वयक तन्मय कानिटकर आणि सायली दोडके यांनी दिली.