life imprisonment punishment court
sakal
पुणे - शेतीच्या रस्त्याच्या वादातून एकाचा धारदार शस्त्राने खून करणाऱ्या मुळशी तालुक्यातील मरगळे कुटुंबातील पाच जणांना न्यायालयाने जन्मठेपेसह प्रत्येकी पाच हजार पाचशे रुपये दंडाची शिक्षा सुनावली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी. आर. चौधरी यांनी हा निकाल दिला. सहा आरोपींपैकी एक आरोपी अल्पवयीन तर उर्वरित आरोपी घटना घडली तेव्हा विशीच्या आतील होते.