कोरोनाच्या रूग्णांसाठी आणखी पाच हॉस्पिटल;आयसीयू, ऑक्‍सिजनच्या तीनशे बेड

coronavirus
coronavirus

पुणे - पुण्यातील कोरोनाचा संसर्ग आणखी वाढण्याच्या भीतीने आणखी पाच खासगी हॉस्पिटलमधील सगळ्या बेड ताब्यात घेऊन; त्या ठिकाणी रुग्णांची सोय केली जाणार आहे. त्यामुळे ‘आयसीयू’ आणि ऑक्‍सिजनच्या तीनशे बेड उपलब्ध होतील. अनलॉक सुरू झाल्यानंतर ‘सोशल डिस्टन्सिंग’ पाळले जात नसल्याने दाट लोकवस्त्यांमध्ये म्हणजे, झोपडपट्ट्यांत कोरोना पसरण्याच्या धास्तीने महापालिका उपचार व्यवस्था विस्तारत आहे. 

शहरात गेल्या २० दिवसांपासून रुग्णसंख्या कमी होत असल्याचे आकडेवारीवरून दिसत आहे. सध्या रोज सरासरी १२०० रुग्ण सापडत आहेत. मात्र, त्यात अत्यावस्थ म्हणजे, व्हेंटिलेटर, ऑक्‍सिजनची गरज असलेल्यांचे प्रमाण वाढले आहे. मुळात, नागरिकांची तपासणी (स्वॅब घेण्याचे प्रमाण) कमी केल्याने रुग्णसंख्या घटल्याचे दिसत आहे. मात्र, तीन ऑगस्टपासून व्यवहार पूर्ववत झाल्याने रस्त्यांवर गर्दी वाढली. परिणामी, ‘सोशल डिस्टन्सिंग’ पूर्णपणे संपले आहे. त्याचवेळी विशेषत: झोपडपट्‌ट्‌यांच्या भागांतील बंधने उठली आहेत. त्यामुळे अशा भागांत पुन्हा रुग्ण वाढू शकतात, हे महापालिकेचे आरोग्य खाते सांगत आहे. या पार्श्‍वभूमीवर नव्याने पाच हॉस्पिटलमध्ये सहजरित्या उपचार मिळावेत, यासाठी महापालिकेने तयारी केली आहे.  

ज्या झोपडपट्ट्यांत सर्वाधिक रुग्ण होते; त्याठिकाणी तूर्तास तरी रुग्ण वाढलेले दिसत नाहीत. मात्र, सध्या सर्वत्र लोकांची गर्दी होत असल्याने पुन्हा दाट लोकवस्त्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढू शकतो. त्यानुसार पुरेशा प्रमाणात कोविड केअर सेंटर्स आणि हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्ध करीत आहोत. 
- डॉ. संजीव वावरे, सहायक आरोग्य प्रमुख, महापालिका

ऐंशी टक्के बेड राखीव
खासगी हॉस्पिटल ताब्यात घेतल्याचा अर्थ त्या हॉस्पिटलमधील ८० टक्के बेड रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात येतात. उर्वरित बेड या अन्य आजाराच्या रुग्णांना वापरता येतील. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com