esakal | सावधान : लोणी काळभोरमध्ये वाढताय कोरोना रुग्ण 
sakal

बोलून बातमी शोधा

सावधान : लोणी काळभोरमध्ये वाढताय कोरोना रुग्ण 

पूर्व हवेलीमधील कदमवाकवस्ती व लोणी काळभोर या दोन ग्रामपंचायत हद्दी चोविस तासाच्या हद्दीत कोरोनाचे तब्बल पाच रुग्ण आढळून आले आहेत. यात लोणी काळभोर येथे ९ जून रोजी सुरू करण्यात आलेल्या कोरोना केअर सेंटरमधील एका महिला तंत्रज्ञाचा समावेश आहे.

सावधान : लोणी काळभोरमध्ये वाढताय कोरोना रुग्ण 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

उरुळी कांचन - पूर्व हवेलीमधील कदमवाकवस्ती व लोणी काळभोर या दोन ग्रामपंचायत हद्दी चोविस तासाच्या हद्दीत कोरोनाचे तब्बल पाच रुग्ण आढळून आले आहेत. यात लोणी काळभोर येथे ९ जून रोजी सुरू करण्यात आलेल्या कोरोना केअर सेंटरमधील एका महिला तंत्रज्ञाचा समावेश आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

लोणी काळभोर, उरुळी कांचन, कदमवाकवस्तीसह पूर्व हवेलीत मागील दोन महिन्यांत 20पेक्षा अधिक कोरोना बाधीत रुग्ण आढळून आल्याने हवेलीकर मोठ्या संकटात सापडले होते. मात्र, 15 दिवसात पूर्व हवेलीत एकही रुग्ण आढळून न आल्याने, पूर्व हवेलीकर बिनधास्त होते. पण, आता गेल्या 24 तासांत लोणी काळभोर व कदमवाकवस्ती या दोनच ग्रामपंचायत हद्दीत तब्बल 5 कोरोना बाधीत रुग्ण आढळून आल्याने पूर्व हवेली चिंतेत आहे. 

संभाजीराजे पुण्याच्या युवकाला म्हणाले, शिवछत्रपतींचा मावळा... 

दरम्यान, कोरोना बाधीत 5 रुग्णांपैकी 3 जण कदमवाकवस्ती हद्दीतील रहिवाशी आहेत. तर, एक 70 वर्षीय कोरोना बाधीत महिला लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीतील एका मळ्यातील रहिवाशी आहे. तर, दुसरीकडे कोरोना केअर सेंटरमधील एका महिला तंत्रज्ञ दिवसभरातील पाचवा कोरोना बाधित रुग्ण ठरली आहे. लोणी काळभोर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांचे आरोग्य अधिकारी डॉ. डी. जे. जाधव यांनी 24 तासांत 2 ग्रामपंचायत हद्दीत 5 रुग्ण आढळून आल्याबाबतच्या वृत्तास दुजोरा दिला आहे. 

शेतकऱ्याच्या पोराची गरुड भरारी

याबाबत अधिक माहिती देतांना डॉ. डी. जे. जाधव म्हणाले, ‘कदमवाकवस्ती हद्दीतील रहिवाशी असलेला आणि हडपसर येथील एका नामांकित कंपनीतील एक तेवीस वर्षीय कामगार गुरुवारी दुपारी कोरोना बाधित असल्याचे आढळून आले होते. संबधित कामगाराच्या संपर्कात आलेले, त्याचे आई व लहान भाऊ असेही दोन जण शुक्रवारी कोरोना बाधित असल्याचे आढळून आले आहे. तर लोणी काळभोर हद्दीतील एक सत्तर वर्षीय महिला शुक्रवारी दुपारी कोरोनाबाधित असल्याचे आढळुन आले आहे. लोणी काळभोर येथे मंगळवारी (ता. ९) सुरु झालेल्या कोरोना केअर सेंटरमधील एका महिला तंत्रज्ञही कोरोनाबाधीत असल्याचे स्पष्ट झाले आहे. महिला तंत्रज्ञाचे वडील कोरोनाबाधीत असल्याने, संबधित तंत्रज्ञांची तपासनी करण्यात आली होती. दरम्यान महिला तंत्रज्ञ ही पिसोळी परीसरातील रहिवाशी असल्याने व 3 दिवसांपासून वरील तंत्रज्ञ कामावर आली नसल्याने कोविड सेंटरमध्ये आलेल्यांनी घाबरुन जाण्याचे कारण नाही.’

पोलिसांचा 'तो' व्हिडीओ अन् त्यामुळे पुण्यातील 'या' भागात...

loading image
go to top