Crime News : लोणी काळभोर येथील पाच अट्टल गुन्हेगार दोन वर्षासाठी पुणे शहर, पिंपरी चिंचवड, पुणे ग्रामीण जिल्ह्यातून तडीपार

गंभीर गुन्हे करून परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या पाच अट्टल गुन्हेगारांना लोणी काळभोर पोलिसांकडून २ वर्षासाठी पुणे शहर, पिंपरी चिंचवड व जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे.
Tadipaar
Tadipaarsakal
Updated on

- सुनील जगताप

थेऊर - लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हातभट्टीची दारु विक्री करणे, जिवे ठार मारणे, बेकायदा हत्यार जवळ बाळगणे, जबरी चोरी, दुखापत करणे, धमकावणे, खुनाचा प्रयत्न करणे, असे गंभीर गुन्हे करून परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या पाच अट्टल गुन्हेगारांना लोणी काळभोर पोलिसांकडून २ वर्षासाठी पुणे शहर, पिंपरी चिंचवड व जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. अशी माहिती पुणे शहर परिमंडळ ५ चे पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांनी दिली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com