
मंचर - इनरव्हिल क्लब ऑफ मंचरने पर्यावरण पुरकमध्ये स्वच्छता अभियान, महिलांच्या उदरनिर्वाहासाठी पार्लर चेअर, शिलाई मशीन,गळक्या घरांना ताडपत्र्या, फासेपारधी वस्तीत सोलार लाईट, वृक्ष लागवड, १२८ कुपोषित मुलांची वैद्यकीय तपासणी व औषध वाटप, गर्भाशय व स्तन कॅन्सर मोफत तपासणी शिबीर, एचआयव्ही बाधित मुलांना व तीन प्राथमिक शाळेतील मुलांना स्वेटर, गणवेश व प्रोटीन पावडर, अनाथ आश्रमात खेळणी व किराणा वाटप आदी राबविलेल्या सामाजिक उपक्रमांची अमलबजावणी केली. या कामाची दखल घेऊन इनरव्हिल क्बलच्या अध्यक्षा रश्मी समदडिया यांना बेस्ट प्रेसिडेंट, स्वाती फुलडाळे यांना बेस्ट सेक्रेटरी व ऑल राऊंड क्लब मंचरला एकूण पाच राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
पुणे येथे झालेल्या ३८ व्या प्रांतीय परिषदेत इनरव्हिल क्लबच्या जिल्हाअध्यक्षा संतोष सिंग यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. तीन हजार रुपये रोख, प्रमाणपत्र व सन्मान चिन्ह देऊन समदडिया व फुलडाळे यांना सन्मानित करण्यात आले.
समदडीया म्हणाल्या “कर्णबधीर मुलांना स्टेशनरी साहित्य, पाबळ येथे द्वारका वृध्दाश्रमात वृध्दांना हिरवी नेट, किराणा, डायनिंग टेबल औषधे, कपडे, ब्लँकेट व दिव्यांगाना व्हिलचेअर, वॉकर, स्टीक व २५० दिव्यांगाना दिवाळी फराळ वाटप करण्यात आले.”
“राज्यातील ७५ इनरव्हिल क्लबमध्ये मंचर इनरव्हिल क्लबने सर्वाधिक पाच राज्यस्तरीय पुरस्कार मिळविले आहेत. मंचर इनरव्हिल क्लबने नाशिकमध्ये १५०दिव्यांगाना किराणा वाटप, हिमाचल प्रदेशात वृद्धाश्रमाला अर्थसहाय्य केले आहे. इनरव्हिल क्लब सदस्य व समदडीया परिवाराच्या सहकार्यामुळे सामाजिक काम करता आले आहे.”
- रश्मी समदडिया, अध्यक्षा इनरव्हिल क्लब मंचर.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.