राज्य बॅंकेच्या भरतीला पाच हजार परीक्षार्थी

राज्यातील सातही विभागात भरती प्रक्रिया पार पडत आहे
Five thousand examinees for State Bank recruitment
Five thousand examinees for State Bank recruitmentSakal

पुणे - राज्य सहकारी बॅंकेची सेवक भरती प्रक्रिया सुरू झाली असून, रविवारी (ता. २४) पार पडलेल्या ऑनलाइन परीक्षेस पाच हजार १५७ परीक्षार्थी उपस्थित होते. राज्यातील सातही विभागात भरती प्रक्रिया पार पडत आहे.

राज्य बॅंकेने लेखनिक पदापासून ते अधिकारी पदापर्यंत ऑनलाइन परीक्षा घेतल्या आहे. इन्स्टिट्यूट ऑफ बॅंकिंग पर्सोनेल सिलेक्शन (आयबीपीएस) या केंद्र सरकारच्या संस्थेकडून ही परीक्षा घेण्यात आल्याचे, प्रशासक विद्याधर अनास्कर यांनी सांगितले. ते म्हणाले,‘‘बॅंकेच्या उज्वल भविष्यासाठी संगणकीकरणाच्या युगात तंत्रस्नेही कर्मचाऱ्यांची भरती होणे आवश्यक होते. बॅंकेने लेखनिक व अधिकारी या संवर्गाच्या रिक्त पदासाठी ही भरती प्रक्रिया सुरू केली आहे. सेवकांची संख्या एक हजार १५० ने कमी होऊन देखील बॅंकेने केवळ १९५ जागा भरण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे प्रशासकीय खर्चात १८० कोटींची बचत होईल.’’ परीक्षेत गैरप्रकार होण्याची सुतराम शक्यता नाही. त्यामुळे कोणीही अशा अफवांवर विश्वास ठेवू नये, असे अनास्कर यांनी स्पष्ट केले.

राज्य बॅंकेचे कर्मचारी विवरण

वर्ष ः कर्मचारी ः प्रति कर्मचारी व्यवसाय (कोटी )

२०११ ः १८४२ ः १५.४३

जूलै २०२२ ः ६७२ ः ४७०२७

विभागानुसार भरतीसाठी प्राप्त अर्ज ः

मुंबई ः १४४७

पुणे ः ११८२

औरंगाबाद ः ९६०

नागपूर ः ८५३

नांदेड ः ३२५

कोल्हापूर ः ३०९

अहमदनगर ः ८२

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com