
पंचवार्षिक निवडणूकीत श्री. कोटलिंगनाथ शेतकरी विकास पॅनलचा दणदणीत विजय
इंदापूर : उजनी धरण पाणलोट क्षेत्रातील महत्त्वपूर्ण असलेल्या पडस्थळ ( ता. इंदापूर ) येथील सानेगुरुजी विविध कार्यकरी सेवा सहकारी सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणूकीत ( सन २०२२ ते २०२७) श्री. कोटलिंगनाथ शेतकरी विकास पॅनलचा दणदणीत विजय झाला. या सोसायटीची स्थापना सन १९६५ मध्ये दिवंगत नेते गणपतराव आवटे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली होती.त्यावेळेपासून सोसायटीची निवडणूक बिनविरोध होत होती. यंदा प्रथमच निवडणूक होवून श्री. कोटलिंगनाथ शेतकरी विकास पॅनलचे विजयी उमेदवार चांगल्या मताधिक्याने विजयी झाले.
निवडणूक निर्णय अधिकारी एम. पी. राऊत यांनी घोषीत केलेले विजयी उमेदवार पुढील प्रमाणे : सर्वसाधारण मतदारसंघ : १)आजिनाथ गणपत कदम, २) वालचंद संभू कोळेकर, ३) बळीराम तुकाराम बोंगाणे, ४) भारत राजाराम बोंगाणे, ५) सुग्रीव लक्ष्मण बोंगाणे, ६)तुळशीराम ज्ञानदेव मारकड, ७) विशाल संदिपान मारकड, ८)सागर परशुराम रेडके. महिला राखीव मतदार संघ.१) छबाबाई केरदास पवार.२)रसीका सुग्रीव सरडे. भटक्या जाती, विमुक्त जमाती/ विशेष मागास प्रवर्ग मतदारसंघ १) कैलास विठ्ठल झिटे.अनुसूचित जाती जमाती मतदार संघ : १) आलेश्वर केरू कांबळे.
विजयी श्री.कोटलिंगनाथ शेतकरी विकास पॅनलचे पॅनल प्रमुख म्हणून पांडुरंग मारकड, विठ्ठल बोंगाणे,परशुराम रेडके, महेंद्र रेडके, सुभाष बोंगाणे,कुंडलिक राऊत,रामदास रेडके,विष्णुदास रेडके, दत्तात्रेय रेडके,रेवणनाथ गव्हाणे,तानाजी बोंगाणे,महादेव आवटे, विक्रम बोंगाणे,कैलास रेडके, बापू गव्हाणे,रामभाऊ मारकड, दशरथ बोंगाणे,चंद्रकांत बोंगाणे, विष्णू कोळेकर, वसुदेव मारकड यांनी प्रयत्न केले.
Web Title: Five Year Election Shri Kotlingnath Farmers Development Panel Won Indapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..