esakal | Video : पाच वर्षाच्या चिमुकलीने केले दोन मिनिटात भीमानदीचे पात्र पार
sakal

बोलून बातमी शोधा

Roshani-Awale

वयाच्या दोन वर्षांपासून रोशनीला वडिलांनी पोहण्याचे बाळकडू (धाडस) दिल्याने वयाच्या पाचव्या वर्षी भीमा नदीचे तुडुंब भरलेले पात्र कोरेगाव भिवर (ता. दौंड) येथील चिमुरडी रोशनी महेश आवाळे हिने दोन मिनिटाच्या कालावधीत पार केल्याने परिसरातील नागरिकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. मुसळधार झालेल्या पावसामुळे सध्या भीमा नदी दुथडी भरून वाहत आहे. त्यामुळे चांगले अट्टल पोहणा-यांना पण पुराच्या वाहत्या पाण्यात पोहणे मोठया जिकरीचे होते.

Video : पाच वर्षाच्या चिमुकलीने केले दोन मिनिटात भीमानदीचे पात्र पार

sakal_logo
By
प्रा. संतोष काळे

राहू - वयाच्या दोन वर्षांपासून रोशनीला वडिलांनी पोहण्याचे बाळकडू (धाडस) दिल्याने वयाच्या पाचव्या वर्षी भीमा नदीचे तुडुंब भरलेले पात्र कोरेगाव भिवर (ता. दौंड) येथील चिमुरडी रोशनी महेश आवाळे हिने दोन मिनिटाच्या कालावधीत पार केल्याने परिसरातील नागरिकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. मुसळधार झालेल्या पावसामुळे सध्या भीमा नदी दुथडी भरून वाहत आहे. त्यामुळे चांगले अट्टल पोहणा-यांना पण पुराच्या वाहत्या पाण्यात पोहणे मोठया जिकरीचे होते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुराच्या पाण्यामुळे अनेक बंधारे पाण्याखाली गेले होते. पाण्याचा रौद्ररूप पाहुन देखील काळजाचे ठोके वाढतात. मात्र रोशनीचे हे धाडस पाहुन नागरिकांनी कमालीचे आश्यर्य व्यक्त केले. रोशनी मुळातच धाडशी होती. ती दीड वर्षाची असताना रिकामी दोन लिटर पाण्याची पॅंकबंध बाटली कंबरेला बांधून तीचे वडिल महेश तिला पोहण्यासाठी नेत होते. नदी, पाण्याची भीती तीच्या मनातील कमी होईल. तसेच तीला पोहण्याची आवड निर्माण होईल. तिचा आत्मविश्वास वाढेल ह्या भावनेतून मी तीला रोज सकाळी भीमा नदी पात्रात पोहण्यासाठी घेऊन जात होतो.

पुण्यातील प्रकार; कोरोना रुग्णांची आर्थिक लूट करत बिलांत ७८ लाख जादा आकारल्याचे उघड

प्रतिक्रिया -
मी लहान असल्यामुळे मला पोहायला घेऊन जाऊ नये म्ह्णून माझ्या आईने मला घरातच अनेकदा कोंडून ठेवले. माझ्या आईला भीती वाटायची वडिल घेल्यासारखे करून पुन्हा मला घेऊन जायचे. माझ्या मनातील भीती हळूहळू कमी होत गेली. मी दीड वर्षाची असताना पोहायला सुरूवात केली. मी आता पाच वर्षाची आहे. मला पोहण्याची भीती नाही. मी कसलेही तुडुंब भरलेले नदीपात्र पोहून पार करू शकते.
- रोशनी आवाळे.

प्रॉपर्टी कार्डला आता कायदाच ठरत आहे अडसर

रोशनीला ऑल्पिकसाठी तयार करणार
मला एक मुलगा व एक मुलगी आहे. रोशनीचे वाढते धाडस पाहता ती खुप जिद्द, चिकाटी आहे. शाळेलापण हुशार आहे. आम्हालापण वाटत नव्हते ती भीमा नदाचे पात्र पार करील पण तीने दीड मिनिटाच्या कालावधीत पार केले. तीचा रोज एक तास नदीपात्रात सध्या पोहण्याचा सराव करते. तीला भविष्यात तालुका, जिल्हा, विभाग, देशपातळीवरील पोहण्याच्या स्पर्धेत उतरवणार आहे. भविष्यात ऑल्पिक स्पर्धेसाठी आमच्या कुटूंबाचा प्रयत्न राहणार आहे.
- महेश आवाळे, रोशनीचे वडिल

रोशनीचा पोहण्याचा सराव पाहता आमच्या गावातील अनेक मुलींना पोहण्याची आवड निर्माण झाली. मुलींच्या स्वरक्षणासाठी पोहायला येणे नक्कीच चांगले आहे. गावामध्ये मुलींना पोहण्यासाठी स्वतंत्र्य स्विमिंग टॅंक बांधला जाईल.
- सरला सोमनाथ काळे, माजी सरपंच, कोरेगाव भिवर

Edited By - Prashant Patil

loading image