Video : महाराष्ट्र दिनानिमित्त अजित पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण

सकाळ वृत्तसेवा
Friday, 1 May 2020

महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेला 60 वर्ष पूर्ण झाले

पुणे : महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेला 60 वर्ष पूर्ण झाले असून, महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या वर्धापन दिनानिमित्त उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात झालेल्या शनिवारी आयोजित या ध्वजारोहण कार्यक्रमास विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पिंपरी-चिंचवडचे महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, पोलिस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम, संदीप बिष्णोई, पोलिस अधीक्षक संदीप पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, अतिरिक्त जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे तसेच अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंग पाळून साधेपणाने हा कार्यक्रम साजरा करण्यात आला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Flag hoisting in Pune