उजनी धरणावर परदेशी फ्लेमिंगोची एंट्री!

प्रा. प्रशांत चवरे
Saturday, 14 December 2019

- पयर्टकांमध्ये आनंद

भिगवण : इंदापूर तालुक्यातील डिकसळ, कुंभारगांव, तक्रारवाडी परिसरामध्ये स्थलांतरीत परदेशी रोहित(फ्लेमिंगो) पक्ष्यांचे आगमण झाले आहे. चालूवर्षी उजनी धरणामध्ये भरपूर पाणी असल्यामुळे रोहित पक्ष्यांचे आगमण सुमारे पंधरा दिवसांनी लांबले होते. परंतु, सध्या पक्ष्यांचे समाधानकारक आगमण झाले असून, आणखीही संख्या वाढण्याची शक्यता पक्षी अभ्यासकांनी व्यक्त केली आहे.   

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

इंदापूर तालुक्यामध्ये उजनी धरणाच्या उभारणीनंतर मागील चाळीस वर्षांपासून हिवाळी पयर्टनासाठी उजनी जलाशयाचा पाण्याचा फुगवटा एक उत्तम पर्याय म्हणुन पुढे येत आहे. उजनी जलाशयाचा विस्तीर्ण परिसर, जिकडे तिकडे पाणीच पाणी, लाखो पक्ष्यांचा किलबिलाट, जलाशयावर विहार करणारे विविध प्रकारचे पक्षी, मच्छीमारांच्या होड्या, खमंग भोजन व सायंकाळी अस्ताला चाललेल्या सुयार्चे उजनीच्या जलाशयामध्ये पडलेले प्रतिबिंब असे विहंगम दृश्य सध्या उजनीच्या पाण्याच्या फुगवट्यावर पहावयास मिळत आहे. पक्षीमित्रांचे प्रमुख आकर्षण असलेल्या रोहित पक्ष्यांचे आगमण झाल्यामुळे पक्षी निरीक्षकांनी आनंद व्यक्त केला आहे.

आणखी वाचा - आता मंत्रालयाचे कामकाज दररोज सुरू राहणार

रोहित पक्ष्यांबरोबरच राखी बगळे, पान कोबड्या, बदक, सपर्मित्र दविर्मुख आदींसारख्या सुमारे पन्नास ते साठ प्रकारच्या पक्ष्यांची गर्दी जलाशयावर पहावयास मिळत आहे. बगळ्यासारखी उंची, अग्नीपंख, काटकीसारखे लांब पाय, उंच मान व त्याचा रुबाबदारपणा यामुळे रोहित पक्षी हा पक्षी निरीक्षकांच्या आकषर्णाचा केंद्रबिंदू ठरला आहे.

डिसेंबर ते एप्रिल या चार ते पाच महिन्यांमध्ये रोहित पक्ष्यांचे उजनी जलाशयाच्या पाण्याच्या फुगवट्यावर वास्तव्य असते.परिसरामध्ये असलेली निरव शांतता, रहदारीपासून दूर, मुबलक खादय असे पूरक वातावरण या परिसरामध्ये असल्यामुळे रोहित पक्षी सातत्याने येत आहे. सध्या  इंदापूर तालुक्यातील डिकसळ, कुंभारगांव, तक्रारवाडी तसेच दौंड तालुक्यातील खानोटा परिसरामध्ये पक्ष्यांचे पक्ष्याचे थवे दिसत आहे.

याबाबत येथील मत्स व्यावसायिक व पक्षी अभ्यासक संदीप सल्ले म्हणाले, चालू वर्षी उजनी धरणांमध्ये जास्त पाणी असल्यामुळे पक्ष्यांचे आगमण थोडे लांबले होते. परंतु सध्या रोहित पक्ष्याचे उजनी जलाशयांमध्ये आगमण झाले आहे. सध्या पक्ष्याची संख्या समाधानकारक आहे आणखीही ही संख्या वाढण्याची शक्यता आहे.

फ्लेमिंगोकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दुरुस्तीची आवश्यकता

इंदापूर तालुक्यातील हिवाळी पर्यटनासाठी फ्लेमिंगो हा परदेशी पक्षी खऱ्या अर्थाने वरदान आहे. परंतु पर्यटकांच्या गरजांकडे मात्र प्रशासनाकडून दुर्लक्ष होताना दिसत आहे. सध्या डिकसळ ते डिकसळ पुल हा फ्लेमिंगोच्या ठिकाणाकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरावस्था झाली आहे. या ठिकाणांहुन जात असताना धुळीमुळे मोठा त्रास होतो. फ्लेमिंगो व इतर पक्ष्यांच्या दशर्नासाठी येत असलेल्या पयर्टकांना सुविधा देण्याची आवश्यकता आहे.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Flemingo on Ujani Dam