

NDRF Launches Boat Rescue as Pavana River Inundates Jambe Village
esakal
हिंजवडी : पवना नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली असून, आयटी हबलगतच्या जांबे गावातील गावठाण परिसराला पुराचा जोरदार फटका बसला आहे. नदीच्या पाण्याने गावठाणातील अनेक घरे वेढल्याने परिस्थिती गंभीर बनली. यानंतर तातडीने दाखल झालेल्या एनडीआरएफ दलाच्या जवानांनी बोटींच्या सहाय्याने बचाव मोहीम राबवत सुमारे २५ नागरिकांना सुखरूप बाहेर काढून सुरक्षितस्थळी हलविले.