
Pune flood risk increases by 40 percent in Mula Mutha river
esakal
पुणे : गेल्या काही दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणांतून मोठ्या प्रमाणात पाण्याचा मुळा-मुठा नदीपात्रात विसर्ग करावा लागला आहे. परंतु नदीची वहन क्षमता कमी झाल्याने पुणे शहर आणि उपनगरांमध्ये पुराचा धोका ४० टक्क्यांनी वाढल्याचे जलसंपदा विभागाच्या ताज्या अहवालात स्पष्ट झाले आहे, असा दावा पर्यावरणप्रेमी सारंग यादवडकर, विवेक वेलणकर, पुष्कर कुलकर्णी यांनी केला आहे.