
पुणे : खडकवासला प्रकल्प आणि पवन धरण, मुळशी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे मुळा-मुठा नदीत ८५ हजार क्युसेक पाणी सोडण्यात आल्याने पुणे शहरात पूरस्थिती निर्माण झाली. एकतानगरी, पुलाची वाडी, खिलारेवाडी, तपोधाम, मंगळवार पेठ, पाटील इस्टेट, येरवड्यातील शांतिनगर, ताडीवाला रस्ता यासह अन्य भागात पाणी शिरल्याने तेथील ४०४ कुटुंबातील १ हजार ४९८ नागरिकांना पुणे महापालिकेने सुरक्षित स्थळी स्थलांतरित केले.