मुंबई, चेन्नईसाठी निर्माण होणार 'पूर चेतावणी प्रणाली'

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 9 June 2020

- किनारपट्टीच्या भागांचा अभ्यास महत्वाचा
- डॉ. एम व्ही रामना मुर्थी यांचे मत
- आयआयटीएम तर्फे वेबिनारचे आयोजन

पुणे : किनारपट्टीच्या भागांमध्ये निर्माण करण्यात आलेल्या डॅम, पोर्ट, लोकवस्त्या यामुळे किनारपट्टीची धूप (झीज) आणि त्यामुळे पूर स्थिती निर्माण होण्याची शक्यता वाढते. प्राकृतिक घडामोडींना रोखणे शक्य नसून यामुळे होणारे नुकसान नक्कीच कमी केले जाऊ शकतात. यासाठी किनारपट्टीवरील होणाऱ्या बदलांना समजून घेणे व त्यानुसार उपाययोजना करण्याची गरज आहे. याकरिता भूविज्ञान मंत्रालयातर्फे 'वेब-जीआयएस बेस्ड कोस्टल चेंज सिस्टिम' निर्माण करण्यात आले आहे. लवकरच या प्रणालीला कार्यरत करण्यात येईल अशी माहिती नॅशनल सेंटर फॉर कोस्टल रिसर्च'चे (एनसीसीआर) संचालक डॉ. एम व्ही रामना मुर्थी यांनी दिली.

एनजीटीला शासकीय कामांची 'लागण'; न्यायाधीश, तज्ज्ञांची निवड कोरोनामुळे...

भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्थेच्या वतीने 'किनारपट्टीच्या भागांमध्ये धूप आणि पूरस्थिती कमी करण्यासाठी सक्षम उपाययोजना' या विषयावर वेबिनार सत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सत्राचे प्रमुख वक्ते डॉ. मुर्थी बोलत होते. 

पुणेकरांनो सावधान; पाऊस येतोय

भारताच्या किनारपट्टीची क्षेत्रफळ हे सात हजार 517 किमी इतके आहे. सुनामी, चक्रीवादळ आणि मुसळधार पावसामुळे किनारपट्टीची धूप आणि या भागातील पूर स्थितीमुळे जीवितहानी आणि मालमत्तेचे नुकसान स्वाभाविकच आहे. यावर्षी सुद्धा आलेल्या 'अम्फान' आणि 'निसर्ग' या चक्रीवादळांमुळे बहुतांश भागांमध्ये मोठे नुकसान झाल्याचे दिसून आले. यासाठी पूर्वसूचना आणि चेतावणी प्रणालीला आधुनिक तंत्रज्ञानानी परिपूर्ण करण्याची गरज आहे. सध्या 'कोस्टल चेंज सिस्टम'च्या माध्यमातून विविध राज्यांच्या किनारपट्टीतील घडामोडींचा आढावा घेत असल्याचे डॉ. मुर्थी यांनी यावेळी सांगितले.

Video : केरळच्या `त्या` हत्तीणीला पुण्याच्या `या` हरिणीचा वाटत असेल हेवा....

मुंबई आणि चेन्नई साठी 'पूर चेतावणी प्रणाली'

मुंबई आणि चेन्नई या भागांमध्ये आलेल्या पूराचा अभ्यास करून 'पूर चेतावणी प्रणाली' विकसित करण्यात आली असून चेन्नई येथे याची सुरुवात केली आहे. तसेच मुंबईसाठी सध्या संपूर्ण शहरातील किनारपट्टीचे व ड्रेनेज सिस्टिमचा आढावा घेण्यात आला आहे. त्यामुळे पूर आल्यावर या पाण्याला समुद्रात कसे सोडता येईल याची उपाययोजना करण्यास मदत मिळेल. तसेच कोणत्या भागात पूर येऊ शकेल याबाबत पूर्वसूचना देणे शक्य होईल असे डॉ. मुर्थी यांनी सांगितले.

 पुण्याच्या इतिहासातील 'ती' काळी तारीख...ढगफुटी...आंबिल ओढा..अन्...  

भारतीय किनारपट्टीची झालेली झीज (1990 ते 2016 दरम्यान)
भारताची किनारपट्टी : किनारपट्टीची धूप (झीज) टक्केवारीत
पश्चिमी किनारपट्टी : 27 टक्के
पूर्व किनारपट्टी : 38 टक्के
पुण्यातील तरूणांनी धुळ्यातल्या काकांसाठी काय केले पाहा... ​

'वेब-जीआयएस बेस्ड कोस्टल चेंज सिस्टिम'द्वारे या गोष्टींचा घेण्यात येणार आढावा 
- किनारपट्टीत होणारे बदल
- किनाऱ्यावरील विकास
- किनारपट्टीच्या भागात कमी अथवा वाढ झालेले क्षेत्रफळ
- समुद्राच्या पातळीत होणारी वाढ
- किनारपट्टी नजीकच्या क्षेत्राचे मोजमापन 

किनारपट्टीवरील होणारे प्रमुख कार्य आणि संसाधन
- तेल आणि गॅस प्रकल्प
- उत्खनन कार्य
- मासेमारी आणि मत्स्यपालन
- पोर्ट व विद्युत प्रकल्प
- पर्यटन


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: flood warning system to be set up for Mumbai and Chennai