
वारजे : पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणातून मुठा नदीत मोठ्या प्रमाणात पाणी सोडले जाते, मात्र त्यामुळे नदीकिनारी असलेल्या अनेक भागांमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण होते.
याचा फटका वारजे येथील एकमेव स्मशानभूमीलाही बसतो. दरवर्षी पावसाळ्यात पाण्याचा विसर्ग वाढल्यानंतर ही स्मशानभूमी पूर्णपणे पाण्याखाली जाते. त्यामुळे वारजेकरांना अंत्यसंस्काराच्या विधीसाठी अडचणींचा सामना करावा लागतो.