esakal | फुलविक्रेत्याची अशीही माणुसकी; अंत्यसंस्कारासाठी...
sakal

बोलून बातमी शोधा

Florists started selling flowers and garlands on the principle of no profit no loss during lockdown.jpg

अंत्यविधीसाठी मृतांवर हार-फुले वाहण्यात येतात. मात्र फुलांची, अंत्यसंस्काराचे साहित्य पुरविणारे बहुतांश दुकाने बंद आहेत. अनेकदा फुलांविनाच अंत्यविधी उरकले आहेत. यामुळे अनेक नातेवाईक नाराज होते. पुष्कळवेळा आहेर यांना फुलांसाठी विचारणा व्हायची, पण दुकान बंद होते.

फुलविक्रेत्याची अशीही माणुसकी; अंत्यसंस्कारासाठी...

sakal_logo
By
आशा साळवी

पिंपरी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात कोरोना आणि इतर आजाराने निधन झालेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांना हार फुले आणि अत्यंसंस्काराचे साहित्य मिळेनासे झाले आहे. यासाठी पिंपरीतील फुलविक्रेते गणेश आहेर यांनी 'ना नफा ना तोटा' या तत्वावर हार-फुले उपलब्ध केली आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍपअंत्यविधीसाठी मृतांवर हार-फुले वाहण्यात येतात. मात्र फुलांची, अंत्यसंस्काराचे साहित्य पुरविणारे बहुतांश दुकाने बंद आहेत. अनेकदा फुलांविनाच अंत्यविधी उरकले आहेत. यामुळे अनेक नातेवाईक नाराज होते. पुष्कळवेळा आहेर यांना फुलांसाठी विचारणा व्हायची, पण दुकान बंद होते. यातूनच त्यांनी "ना नफा ना तोटा" यावर  होणाऱ्या अंत्यविधीसाठी लागणारे हार फूले तूळशीचे पाने आपल्या राहत्या घरी नखाते वस्ती रहाटणी येथे नागरिकांना बोलवून उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्यांच्या या माणुसकीच्या दर्शनामुळे शहरातून त्यांचे कौतुक केले जात आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा''

लाॅकडाऊन सूरू झाल्यापासून शेकडो लोकांना हार फूले तूळशीचे पाने अंत्यविधी साठी त्यांनी उपलब्ध केली आहेत.

loading image
go to top